डिस्चार्ज मिळाल्यानंतर ईडी करणार आनंदराव अडसूळांकडे चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 07:49 AM2021-09-29T07:49:46+5:302021-09-29T07:50:19+5:30

अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते.

After getting the discharge the ED will inquire into Anandrao Adsula citi co op bank case pdc | डिस्चार्ज मिळाल्यानंतर ईडी करणार आनंदराव अडसूळांकडे चौकशी

डिस्चार्ज मिळाल्यानंतर ईडी करणार आनंदराव अडसूळांकडे चौकशी

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते.

मुंबई : ईडीच्या चौकशीवेळी अत्यवस्थ झालेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची चौकशी काही दिवसांसाठी टळली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एक अधिकारी वगळता ईडीचे पथक रुग्णालयातून माघारी परतले आहे. अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ९८० कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष असलेल्या अडसूळ पिता-पुत्राकडे सोमवारी कांदिवली येथील निवासस्थानी चौकशी करण्यास अधिकाऱ्यांचे पथक गेले. त्यांना समन्स बजावून ताब्यात घेतले  जात असताना अडसूळ यांची प्रकृती बिघडली. त्यांना गोरेगाव येथील लाइफ लाइन रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचे पुत्र अभिजित  व कुटुंबातील सदस्याबरोबर ईडीचे अधिकाऱ्याचे एक पथकही सोबत होते.

सर्व चाचण्या केल्यानंतर त्यांना ४८ तास देखरेखीखाली ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालयकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सुमारे १४ तास त्यांच्यासोबत असलेले ईडीचे पथक माघारी परतले.  रुग्णालयातील घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे एका अधिकाऱ्याला ठेवण्यात आले आहे. अडसूळ व त्यांच्या मुलाकडे ते रुग्णालयातून घरी परतल्यावर चौकशी केली जाईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: After getting the discharge the ED will inquire into Anandrao Adsula citi co op bank case pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.