पराभवानंतर उदयनराजेंनी म्हटलं 'सॉरी' चुकलो; पण शशिकांत शिंदेंनी दिलं 'असं' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 08:55 AM2019-12-05T08:55:32+5:302019-12-05T09:04:39+5:30

तुम्ही स्वत:चे आणि माझे फार मोठे राजकीय नुकसान केलेले आहे.

After the defeat in the elections, Udayan Raje said 'sorry'; But Shashikant Shinde gave the answer | पराभवानंतर उदयनराजेंनी म्हटलं 'सॉरी' चुकलो; पण शशिकांत शिंदेंनी दिलं 'असं' उत्तर

पराभवानंतर उदयनराजेंनी म्हटलं 'सॉरी' चुकलो; पण शशिकांत शिंदेंनी दिलं 'असं' उत्तर

googlenewsNext

मुंबई - सातारा येथील भिवडी गावातील कार्यकर्त्यांच्या लग्नात माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट झाली. मात्र ही भेट चुकून झालेली होती. अश्रू अनावर झाले अशा बातम्या निराधार आहेत. उदयनराजेंचा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी दिलं आहे. 

शशिकांत शिंदे यांनी ट्विट करुन म्हटलंय की, महादेश शेलार नावाच्या कार्यकर्त्यांचं भिवडी येथे लग्न होतं. त्यावेळी मी तिथे गेलो होतो. एका बाजूला उभा असताना उदयनराजेंनी येऊन मला मिठी मारली. सॉरी चुकलो असं दोन वेळा ते म्हणाले, मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही. पुढे त्यांना म्हणालो की, तुम्ही स्वत:चे नुकसान करुन घेतले आणि माझेही केले. २० वर्षाच्या राजकारणात माणूस कष्ट करुन निवडून यायला जातो त्यावेळेस आज जर निवडून आलो असतो तर पवारसाहेबांनी खूप मोठी संधी दिली असती. त्याला मुकलो आहे अशी खंत व्यक्त केली. 

तसेच तुम्ही स्वत:चे आणि माझे फार मोठे राजकीय नुकसान केलेले आहे. त्यामुळे आता सॉरी बोलून फायदा नाही. आता त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे ज्या अश्रू आले वैगेरे बातम्या आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेसोबत ठाम आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आतापर्यंत मी पार पाडत आलो आहे. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि मी माझ्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया दिली. एवढ्यापुरतीच ही भेट मर्यादित होती असा खुलासा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. 
दरम्यान, उदयनराजे आणि माझा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी हे सत्य मी समोर आणलं आहे. शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात काम करत आहे अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेंनी मित्राचं ऐकलं नाही किंवा राजेंना थांबविण्यात शिंदेंना अपयश आले. त्यामुळे निवडणूक काळात हे सख्खे मित्र पक्के वैरी बनल्यासारखं दिसून आलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोडपट पक्षाची भूमिका पार पाडली. त्यामुळे दोघांचाही आपल्या-आपल्या मतदारसंघातून पराभव झाला. 

 

Web Title: After the defeat in the elections, Udayan Raje said 'sorry'; But Shashikant Shinde gave the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.