शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘डाकू’ जाळ्यात

By admin | Updated: September 4, 2014 00:51 IST

सिंदी(रेल्वे) येथील एका सहा वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करणारा दहीन शहा उर्फ डाकू गुलाम शहा याला गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण : गोंदिया जिल्ह्यातून अटकवर्धा : सिंदी(रेल्वे) येथील एका सहा वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करणारा दहीन शहा उर्फ डाकू गुलाम शहा याला गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली.डाकू हाच मुख्य आरोपी असल्याचा संशय पक्का होताच तीन पोलीस पथके त्याच्या मागावर होती. तो पोलिसांना ठावठिकाणा कळू नये म्हणून पत्ता बदलत होता. पोलीस त्याचे ‘लोकेशन’ घेऊन त्या ठिकाणी पथक पाठवित होते. अशातच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तो अटक झाल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. १९ आॅगस्ट रोजी सिंदी(रेल्वे) येथील एका वस्तीतून चिमुकलीला उचलून गावाबाहेर महिलांच्या गोदरीवर नेले. तिथे तिच्या अंगावर धारदार शस्त्राने गंभीर जखमा करुन तिच्यावर अतिशय क्रूरपणे अतिप्रसंग केला. या प्रकरणी मात्र सिंदी पोलिसांनी तब्बल २० तासांनी गुन्हा दाखल केला. तसेच इमरान शहा मजलीन शहा (२१) याला अटक दाखवून प्रकरणावर पडदा टाकला. चिमुकलीचा पिता आणि आजीने रज्जू आणि संता या दोघांवर संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी त्यांना सोडून दुसऱ्यालाच आरोपी म्हणून अटक केल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली. याप्रकरणी पोलीस कारवाईत पक्षपात होत असल्याची बाबही निर्भिडपणे मांडली. इतकेच नव्हे, या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास व्हावा आणि खऱ्या आरोपींना अटक व्हावी, यासाठी सदर प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरले. यामुळे काही महिलांसह विविध संघटनांना रस्त्यावर उतरुन चिमुकलीला न्याय देण्याच्या मागण्या करु लागल्या. अखेर जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांना प्रकरणात स्वत: लक्ष घालण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे, तर मनोधैर्य योजनेतून चिमुकलीसाठी साडेतीन लाख रुपये लगेच मंजुर करण्यात आले. अशा घटनेत पीडितेला मनोधैर्य योजनेतून मंजूर झालेले हे महाराष्ट्रातील पहिले प्रकरण असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी दिली. सततच्या पाठपुराव्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रकरणाच्या तपासाला पोलीस प्रशासनाने नवी दिशा दिली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्याकडे आला. त्यांनी नव्याने चिमुकली राहात असलेल्या परिसरातील नागरिकांची कसून विचारपूस सुरू केली. दरम्यान, सुमारे दहा जणांची पोलिसांनी झडती घेतली असता सदर चिमुकलीवर अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा काकाच असल्याचे पुढे आले. यानंतर पोलिसांनी डाकू नावाने कुख्यात असलेल्या तिच्या काकाचा शोध घेणे सुरू केले. आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते ही बाब लक्षात येताच डाकू आपल्या तीन चिमुकल्या मुलांना वाऱ्यावर सोडून पत्नीला सोबत घेऊन पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी तीन पोलीस पथकेही विविध भागात पाठविण्यात आली. अखेर गोंदिया जिल्ह्यात डाकूला अटक करण्यात पोलिसांना यश आले. (जिल्हा प्रतिनिधी)