शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षानंतर बळीराजासाठी पोळा आनंदाची पर्वणी

By admin | Updated: August 28, 2016 16:53 IST

शेतकऱ्यांचा आवडता सण गेल्या तीन वर्षापासून दुष्काळात साजरा होत आहे.

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 28 - शेतकऱ्यांचा आवडता सण गेल्या तीन वर्षापासून दुष्काळात साजरा होत आहे. मात्र यावर्षी चांगल्या पावसाने पिके बहरली असून, गेल्या तीन वर्षानंतर यावर्षीचा पोळा सण बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांठी आनंदाची पर्वणी देणारा आहे. चार दिवसांवर पोळा सण आला असल्याने येथील बाजारपेठ पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्याने सजली आहे.पोळासण बळीराजांसाठी आवडता सण असून येत्या चार दिवसांवर पोळासण येऊन ठेपला आहे. पोळा सणाच्या दिवशी आपल्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी येथील बाजार सजला आहे. गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती; मात्र यावर्षी चांगल्या पावसामुळे पिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे पोळा सणाच्या बाजारपेठेत तीन वर्षानंतर शेतकऱ्यांचा उत्साह दिसून येत आहे.  परिणामी पोळा सणाच्या या बाजारपेठेत  मोठी उलाढाल वाढेल, असा विक्रेत्यांना विश्वास आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या, ज्याच्या मदतीने शेतीची कामे पूर्ण केली जातात अशा आपल्या लाडक्या सर्जा-राजा बैलांसाठी शेतकरी बांधवांना पोळा सणाचे वेध लागले असून, काही वर्षांपासून वरुणराजाच्या अवकृपेने या सणावर विरजन पडत आहे. परिणामी पोळा सणाबाबत असलेला उत्साह दरवर्षी कमी कमी होत असल्याचे दिसून येत आहे; यंदा मात्र जून महिन्याच्या पंधरवाड्यातच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी वेळेवर होऊ शकली. त्यामुळे पीकं सुद्धा चांगली बहरली आहेत. पीकं चांगली असल्याने शेतकऱ्यांचा पोळा सणाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे  बुलडाणा येथे यावर्षीच्या पोळा सणाच्या  रविवारच्या बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पोळा सणाच्या बाजारपेठेत उलाढाल वाढणारपोळा सणानिमित्त बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारात गर्दी झाली आहे. वाढत्या महागाईमुळे विविध वस्तूंच्या किमतीदेखील वाढल्या आहेत.  त्यामुळे यावर्षी पीक चांगले असल्यामुळे पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्याची शेतकरी मोठ्या उत्साहात खरेदी करीत आहेत. त्यामुळे यावर्षी पोळा सणाच्या बाजारातून मोठी उलाढाला होणार असल्याचा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. बैलांच्या साजाची बाजारा गर्दी पोळा सण आल्याने दुकाने बैलांच्या साजाने सजली आहेत. त्यात पैंजण, शिंगासाठी शेंदुरी, कलर, रेबीन, चाळ, पट्टा, कासरा, शिंग गोंडे, केसारी, मणी माळा, पितळी चैन, झुली, चंगाळे, मोरक्या, वेसनी, गुघरं, बाशिंग, कवडीमाळ, तिरंगा माळ, छमडी गोंडा आदि शोभेच्या साहित्याने बाजार सजला आहे.