मोदी सत्तेत येताच अदानींच्या संपत्तीत वाढ

By Admin | Updated: September 18, 2014 12:42 IST2014-09-18T01:36:24+5:302014-09-18T12:42:41+5:30

सारे रेकॉर्ड तोडत अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळविले आहे.

Advani's rise in wealth came when Modi came to power | मोदी सत्तेत येताच अदानींच्या संपत्तीत वाढ

मोदी सत्तेत येताच अदानींच्या संपत्तीत वाढ

मुंबई : सारे रेकॉर्ड तोडत अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळविले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गौतम अदानी चर्चेत होते. त्यांची संपत्ती तब्बल 152 टक्क्यांनी वाढली आहे. 
अदानी समूहाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक असल्याचे बोलले जाते. चीनमधील एका  संस्थेच्या हुरुन रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांपासून अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत आहे. त्यामुळे अदानी यांच्या कंपनीचे बाजार भांडवल 44 हजार कोटी रुपयांवर गेले आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अदानी समूहाबाबत वाद रंगला होता. मोदी यांनी हा समूहाला अत्यल्प किमतीत जमिनी दिल्या, असा आरोपही विरोधक करीत होते.  या अहवालानुसार या  ‘टॉप टेन’ यादीत उद्योगपती मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत. ‘टॉप टेन’ यादीत दुस:या क्रमांकावर सन फार्माचे चेअरमन दिलीप सिघंवी (संपत्तीत 43 टक्के वाढ), अर्सेलर-मित्तलचे लक्ष्मी मित्तल तिस:या स्थानी आहेत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Advani's rise in wealth came when Modi came to power