Fort Names to Ministers: आदित्य ठाकरेंकडे 'रायगड'! मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावं... पाहा कोणाच्या बंगल्याला कोणतं नाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 19:29 IST2022-01-14T19:27:43+5:302022-01-14T19:29:37+5:30
मंत्रालयासमोरील मंत्र्यांचे शासकीय बंगले आतापर्यंत नंबरवरून ओळखले जात होते.

Fort Names to Ministers: आदित्य ठाकरेंकडे 'रायगड'! मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावं... पाहा कोणाच्या बंगल्याला कोणतं नाव?
महाविकास आघाडी सरकार जे निर्णय घेतं, त्या निर्णयावरून कायमच चर्चा रंगते. दोन दिवसांपूर्वी सरकारने मराठी पाट्यांचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बंगल्याबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना आता गड-किल्ल्यांच्या नावांवरून ओळखलं जाणार आहे. आतापर्यंत या बंगल्यांना केवळ क्रमांक दिले होते आणि त्यावरून बंगल्यांची ओळख व्हायची मात्र आता हे बंगले गड किल्ल्यांच्या नावांनी ओळखले जाणार आहेत.
बंगल्यांच्या नावांची यादी
अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)
अ ४ – राजगड (दादा भुसे)
अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)
अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)
अ ९ – लोहगड
बी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)
बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)
बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)
बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)
बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)
बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)
बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)
क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)
क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)
क ३ – पुरंदर
क ४ – शिवालय
क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)
क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)
क ७ – जयगड
क ८ – विशाळगड