शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

राज्यातील सिंचनासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार - जलसंपदामंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 2:27 AM

jayant patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हे जळगावात आले. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांनी ‘लोकमत’च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयाला भेट दिली.

जळगाव : राज्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा प्रस्ताव करून राज्यापालांच्या सूत्रानुसार त्याचे वाटप होईल व त्यातील वाटा तापीच्या प्रकल्पांमध्ये देणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हे जळगावात आले. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांनी ‘लोकमत’च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयाला भेट दिली. ते म्हणाले की, काही प्रकल्पांत केंद्र सरकारचा मागील वर्षभरापासून हिस्सा आलेला नाही. कोरोनाच्या काळात निधी उपलब्ध नसल्याने राज्याचा वाटादेखील कमी आहे. हा वाटा सध्या भरून काढत आहोत. मोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी अतिरिक्त निधी लागेल. हा १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी बाहेरून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यपाल यांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच निम्न तापी प्रकल्पाला हा वाटा मिळणार आहे. गोसेखुर्दमध्ये राज्याचा वाटा कमी आहे. सरकार मोठ्या प्रकल्पांना गती देत आहे. धुळे आणि नंदुरबारच्या २२ उपसासिंचन प्रकल्पांसाठी ११५ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. कुऱ्हा वडोदा प्रकल्पासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव आहे, असे त्यांनी सांगितले.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांभाळणारराष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेबाबत ते म्हणाले की, खान्देश आणि विदर्भातील ८२ मतदारसंघात यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानुसार पुढील काळात मराठवाडा व कोकण भागांचा दौरा करणार आहे. यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. अन्य पक्षांतील काही जणांचे राष्ट्रवादीत प्रवेश झाले. त्यानंतर काही ठिकाणी जुने निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. मात्र ही अडचण आम्ही नक्कीच सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलJalgaonजळगाव