शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
3
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
11
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
12
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
13
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 3:24 PM

आठ राज्यांमध्ये पारा 43 अंशांवर आला आहे. राजस्थानच्या अनेक भागात तर तापमान 48 अंशांच्या पुढे गेले आहे.

Weather Alert : यंदाचा उन्हाळा अतिशय उष्ण आणि जीवघेणा ठरतोय. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा कमी होण्याऐवजी वाढत आहे. ही उष्णतेची लाट कधी थांबणार, हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. उत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये पारा 43 अंशांच्या वरच गेला आहे. राजस्थानच्या अनेक भागात तर तापमान 48 अंशांच्या पुढे गेले आहे. गुजरातमध्येही तापमान 45 च्या पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

तापमान 3 ते 4 अंशांनी वाढणारमागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळाली. बाडमेरमध्ये तर या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. या प्रचंड उन्हात दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळीही घसरली असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात तीन ते चार अंशांनी तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, या राज्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांना उष्मा-संबंधित आजार आणि उष्माघाताचा इशारा जारी केला आहे. IMD नुसार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पुढील चार दिवसांत रात्रीच्या उष्णतेमुळे उष्णतेशी संबंधित आजार आणखी वाढू शकतात.

भूजल पातळी खालावलीअति उष्णतेमुळे वीज ग्रीडवर ताण पडत आहे, पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडत आहेत. याळे देशाच्या काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या म्हणण्यानुसार, भारतातील 150 प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा गेल्या आठवड्यात पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाण्याची टंचाई वाढली आणि जलविद्युत निर्मितीवर लक्षणीय परिणाम झाला. 

24 ठिकाणी तापमानाने 45 अंश पार केलेबुधवारी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील किमान 24 ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले. राजस्थानमध्ये बाडमेरमध्ये 48 अंश सेल्सिअस, चुरूमध्ये 47.4 अंश, फलोदीमध्ये 47.8 अंश आणि जैसलमेरमध्ये 47.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याशिवाय, मध्य प्रदेशातील रतलाम येथे 45 अंश, महाराष्ट्रातील अकोला येथे 44.8 अंश, हरियाणातील सिरसा येथे 47.7 अंश, पंजाबमधील भटिंडा येथे 46.6 अंश, गुजरातमधील कांडला येथे 46.1 अंश आणि उत्तर प्रदेशातील झाशी येथे 45 अंश कमाल तापमानाची नोंद झाली.

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात