अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:20 IST2025-12-04T15:14:59+5:302025-12-04T15:20:36+5:30

मुख्यमंत्र्यांचा बारामतीकरांच्या पाठीशी मोठा आशीर्वाद असल्याचा वडेट्टीवारांचा खोचक टोला

Action is taken against the seller of land, so why not against the buyer of land?; Opposition alleges | अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप

अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप

पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक होते, पण जमीन विकत घेणाऱ्या अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवारवर कारवाई का होत नाही. यातून मुख्यमंत्र्यांचा बारामतीकरांच्या पाठीशी किती मोठा आशीर्वाद आहे हे स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये बोलताना सरकारवर टीका केली.

"पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने जमीन विकत घेतली. या कंपनीत ९९ टक्के भागीदारी ही पार्थ पवारची आहे. जमीन ज्यांनी विकली त्यांच्यावर कारवाई होते, पण जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई होत नाही? पार्थ पवारवर कारवाई झालीच पाहिजे. अधिवेशनात विरोधक हा प्रश्न विचारणार याची सरकारला कल्पना असल्यामुळे काहीतरी कारवाई केल्याचा दिखावा सरकार करत आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समितीला मुदतवाढ देखील यासाठी दिली आहे. या समितीचा अहवाल जर आला असता, तर अधिवेशनात सरकारवर नामुष्की आली असती. सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे," असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला.

"नागपूर इथे हिवाळी अधिवेशन हे तीन आठवडे चालणे अपेक्षित होते. या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळते याकडे लक्ष असते. पण आता निवडणुकीचे कारण दाखवून अधिवेशन सात दिवसात गुंडाळण्यात येणार आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दुसरीकडे आचारसंहितेचे कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही घोषणा करू शकत नाही. त्यामुळे या अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पानेच पुसली जाणार," अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.

"राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये इतक्या तक्रारी आल्या आहे.अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या, मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचे पुरावे तर सत्ताधारी आमदारांनी दिले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. आता जिथे ईव्हीएम ठेवण्यात आले, तिथे सीसीटीव्ही लाईव्ह फुटेज देत नाहीत. खोलीच्या बाहेर जॅमेर लावण्यात आलेले नाही यातून मतचोरी होणार हे स्पष्ट दिसत आहे," असेेह ते म्हणाले.

Web Title: Action is taken against the seller of land, so why not against the buyer of land?; Opposition alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.