मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:33 IST2019-12-30T01:42:20+5:302019-12-30T06:33:32+5:30
केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी संविधान सन्मान मंचच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगावापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात येणार होता, त्यासाठी रितसर परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. दु

मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप
मुंबई : केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी संविधान सन्मान मंचच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगावापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात येणार होता, त्यासाठी रितसर परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. दुसरीकडे राज्य सरकारने काँग्रेसच्या शनिवारीच्या रॅलीला ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगावपर्यंत परवानगी दिली. त्यामुळे ‘मुंबई भाजयुमो’ने सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र, त्याच ऑगस्ट क्रांती मैदानात निघालेल्या काँग्रेसचा रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली कशी? असा सवाल भाजपा युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने पक्षपात केल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्तेसाठी राष्ट्रहिताच्या तत्त्वांशी तडजोड केली, हे मुंबईकर जनतेने पाहिले आहे, असेही ते म्हणाले.