'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:46 IST2025-03-04T11:45:47+5:302025-03-04T11:46:37+5:30

Karuna Sharma on Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

accused urinated on the administration, not on santosh deshmukhs, they should be hanged Karuna Sharma demands | 'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

Karuna Sharma on Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. 

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोला, मग फासावर द्या; भाजपा आमदार संतापले

करुणा शर्मा यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. करुणा शर्मा म्हणाल्या, आज महाराष्ट्राला न्याय मिळेल. काल मी एक फोटो बघितला. या फोटो संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या तोंडावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. या लोकांची मानसिक स्थिती दिसत आहे. हसत हसत संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो, व्हिडीओ काढत आहेत. वाल्मीक कराड तो व्हिडीओ लाईव्ह बघत आहे. आपला महाराष्ट्र कुठे गेला आहे?, असा सवालही करुणा शर्मा यांनी केला. 

या लोकांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. ते लोक खूप क्रूर आहेत. ते लोकांच्या समोर आले आहेत. या लोकांनी लघवी केली आहे ती संतोष देशमुखांच्या चेहऱ्यावर नाही तर प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी लघवी केली आहे, असा आरोपही शर्मा यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी जे कोण आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली होती. आता ही त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करुण शर्मा यांनी केली.  अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, त्यांनी मुंडे यांना पाठीशी घातले आहे, असंही शर्मा म्हणाल्या.

Web Title: accused urinated on the administration, not on santosh deshmukhs, they should be hanged Karuna Sharma demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.