शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

राज्यातील चोरीच्या ६५ हजार गुन्ह्यांतील आरोपी मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:30 IST

राज्यात वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरीच्या

राजेश निस्ताने मुंबई : राज्यात वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरीच्या ६५ हजार ६१५ गुन्ह्यांमधील आरोपी नेमके कोण, हे शोधण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. गंभीर गुन्ह्यांमधील ‘डिटेक्शन’चे हे घटलेले प्रमाण पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कोलमडल्याचे अधोरेखित करीत आहे.२०१७ मध्ये राज्यात चोरीचे ८६ हजार ७५० गुन्हे नोंदविले गेले. त्यापैकी केवळ २४.७६ टक्के म्हणजे २१ हजार १३५ गुन्हे उघडकीस आले. उर्वरित ६५ हजार गुन्ह्यातील चोरटे आजही डीबी स्कॉड, क्राईम ब्रँच, विशेष पथकांना हुलकावण्या देत आहेत. परंतु २५ टक्केही गुन्हे उघडकीसयेत नसल्याने पोलिसांचे खबरेआहेत की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.घरात शिरुन सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याप्रकरणी वर्षभरात घरफोडीचे १५,४१० गुन्हे नोंदविले गेले. परंतु त्यापैकी केवळ ३१.३० टक्के (४८२२) गुन्हे उघडकीस आले.महासंचालकांनी स्वत: केली खातरजमाकायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांनी ‘डमी फिर्यादी’ पाठवून पोलीस ठाणेस्तरावर तक्रार दडपली जात असल्याबाबत स्वत: खातरजमाही करून घेतली.कित्येकदा घरफोडी असेल तर ती चोरी दाखविण्याचा, दरोडा असेल तर पाच पेक्षा कमी आरोपी दाखवून त्याला चोरीचे स्वरूप देण्याचा, जबरी चोरी असेल तर केवळ चोरी दाखवून गुन्ह्याची तीव्रता दडपण्याचा प्रयत्न होतो.‘कामगिरी’ दाखविण्यासाठी पोलीस अनेकदा आंतरराज्यीय टोळी पकडल्याचा दावा करतात. परंतु प्रत्यक्षात त्या गुन्ह्याचा तपास जिल्हास्तरीयही होत नाही.वर्ष टक्केखून ९३.९८खुनाचा प्रयत्न ९८.३२दरोडा ९७.७१वर्ष टक्केदरोड्यासह खून ९०.००पिस्तुलसह दरोडा ७८.९५जबरी चोरी ६८.८४वर्ष टक्केबलात्कार ९७.५२दुखापत ९६.५१दंगे ९७.६१