आळंदजवळ अपघात; सोलापूरचे पाच जण जागीच ठार

By Appasaheb.patil | Published: August 27, 2019 08:53 AM2019-08-27T08:53:28+5:302019-08-27T08:56:41+5:30

देवदर्शन करून परत येत असताना झाला अपघात; तिघांची प्रकृती गंभीर

Accident near Aland; Five people of Solapur were killed on the spot | आळंदजवळ अपघात; सोलापूरचे पाच जण जागीच ठार

आळंदजवळ अपघात; सोलापूरचे पाच जण जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर गावावर पसरली शोककळाअपघातातील जखमीवर आळंदीतील रुग्णालयात उपचार सुरू

सोलापूर : देवदर्शन करून परत आपल्या मूळ गावी येत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक घटना मंगळवारी पहाटे समोर आली. याच अपघातात तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येेथे झाला आहे. 

श्रावणनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील चडचणे कुटुंबीय दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले होते, देवदर्शन आटोपून सोमवारी मूळगावी परत येत असताना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद आळंदी ते अपघात झाला या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच आळंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळता चिंचपूर गावावर शोककळा पसरली. 

 

Web Title: Accident near Aland; Five people of Solapur were killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.