एकवीरा देवीच्या दर्शनास गेलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 20:40 IST2021-11-21T20:40:39+5:302021-11-21T20:40:58+5:30
Accident News: एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मुंबई अहमदाबाद महामार्गावर काळाने घाला घातला आहे. एकविरा दर्शनावरून परतणाऱ्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत अपघात झाला आहे. र

एकवीरा देवीच्या दर्शनास गेलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू
पालघर - एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मुंबई अहमदाबाद महामार्गावर काळाने घाला घातला आहे. एकविरा दर्शनावरून परतणाऱ्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत अपघात झाला आहे. रविवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघातात चालकासह तीन जण ठार झाले आहेत.तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला होता.अपघातात हेमंत तरे (वय.60),सुषमा आरेकर (वय.32)चालक राकेश तमोरे (वय.42) यांचा मृत्यू झाला आहे. इको कार मधील प्रवाशी पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी आहेत.मृतात एका महिलेचा समावेश आहे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. एकविरा दर्शनावरून परतणाऱ्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत अपघात झाला आहे. रविवारी (ता.21) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघातात चालकासह तीन जण ठार झाले आहेत.तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला होता.
याअपघातात हेमंत तरे (वय.60),सुषमा आरेकर (वय.32)चालक राकेश तमोरे (वय.42) यांचा मृत्यू झाला आहे. इको कार मधील प्रवाशी पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी आहेत.मृतात एका महिलेचा समावेश आहे. हर्षद तरे वय २७,भव्या आरेकर वय ४, महेश आरेकर वय ३९,सुनील तामोरे वय ४०,तृप्ती तामोरे वय ३५,सर्वज्ञा आरेकर वय ०२,आकाश पाटील वय २५,रमेश आरेकर वय ५४, जयेश तामोरे वय ०३ जखमी आहेत.जमिंना महामार्गावरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.