शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार कोटींच्या रद्द निविदांवर एसीबीचा तपास केंद्रित

By admin | Updated: September 4, 2015 00:58 IST

बहुचर्चित निम्न पैनगंगा या आंतरराज्यीय प्रकल्पाला आतापर्यंत केवळ ३०० कोटी रुपये मिळाले असून, ही सर्व रक्कम भूसंपादन व आस्थापनेवर खर्च झाली आहे

विलास गावंडे,  यवतमाळबहुचर्चित निम्न पैनगंगा या आंतरराज्यीय प्रकल्पाला आतापर्यंत केवळ ३०० कोटी रुपये मिळाले असून, ही सर्व रक्कम भूसंपादन व आस्थापनेवर खर्च झाली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या प्रकल्पाच्या ३ हजार कोटींच्या रद्द झालेल्या निविदांवर आपला तपास केंद्रित केल्याची माहिती आहे.शासनाने विविध सिंचन प्रकल्पांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे सोपविली आहे. त्यात यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा राज्याला लाभ मिळणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचाही समावेश आहे. मान्यतेच्या वेळी १ हजार ४०० कोटी रुपये बजेट असलेला हा प्रकल्प आता १५ हजार कोटींवर पोहोचला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत मिळालेल्या ३०० कोटींच्या खर्चाचा अपडेट रिपोर्टही आहे. त्यामुळेच एसीबीने आपल्या तपासाची दिशा या प्रकल्पाच्या रद्द झालेल्या निविदांवर केंद्रित केल्याचे सांगितले जाते.या प्रकल्पाला २००९-१०मध्ये केवळ २४ कोटींची ग्रँट मंजूर असताना तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या कालवे व लोखंडी गेटच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच या निविदा रद्दही केल्या गेल्या. या निविदांमध्येच मोठ्या प्रमाणात‘पाणी मुरल्याची’ चर्चा आहे. पैसा नसताना निविदा निघाल्या कशा, त्याचे कंत्राट देताना काही ‘हिशेब’ झाला का, या मुद्द्यांवरच एसीबीच्या चौकशीचा भर राहण्याची शक्यता आहे.मंत्र्यांच्या मतदारसंघातच ओलीतयवतमाळ, चंद्रपूर व तेलंगणासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोधाचे ग्रहण लागले. वास्तविक या प्रकल्पामुळे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मतदारसंघातील सर्वाधिक १ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही मतदारसंघातील जमीनही प्रकल्पातून ओलीत होणार आहे. मात्र तरीही हे दोन्ही मंत्री केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असताना निधीसाठी आग्रही नसल्याचे दिसून येते.युती सरकार उदासीन : विदर्भाला या प्रकल्पातून ८८ टक्के आणि तेलंगणला केवळ १२ टक्के पाणी मिळेल. मात्र या १२ टक्क्यांसाठी तेलंगण सरकार वेगाने कामाला लागले आहे. त्यांनी वनजमिनीतून कालवा खोदण्याची परवानगी मिळविली असून, कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूदही करून ठेवली आहे. याउलट ८८ टक्के पाणी मिळणारे विदर्भातील मंत्री आणि युती सरकार प्रकल्पाबाबत प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येते.