शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण निर्मूलनाची अजब तऱ्हा !

By admin | Updated: January 25, 2015 01:16 IST

राज्य शासन आदिवासींची कशी थट्टा करते, याचा प्रत्यय कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या फळबाग व भाजीपाला लागवड योजनेतून आला आहे़

आदिवासींतील कुटुंबे ६़२६ लाख : मात्र निधी मिळाला अवघा ६ लाखनारायण जाधव- ठाणेठाणे-पालघरसह राज्यातील १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांतील कुपोषण निर्मूलनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असताना यावर ठोस उपाययोजनेऐवजी राज्य शासन आदिवासींची कशी थट्टा करते, याचा प्रत्यय कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या फळबाग व भाजीपाला लागवड योजनेतून आला आहे़राज्यात ६ लाख २६ हजार ५२४ आदिवासी कुटुंबे असून, परसबागेत फळबाग आणि भाजीपाला लागवड करण्यास राज्य शासनाने अवघा सहा लाखांचा निधी नववर्षाच्या सुरुवातीस वितरीत केला आहे़ प्रत्येक जिल्ह्याच्या वाट्याला ५० हजार, तर आदिवासी कुटुंबाच्या वाट्याला प्रत्येकी एक हजारपेक्षा कमी रक्कम येणार आहे़ यातून कोणत्या प्रकारे आदिवासींचे कुपोषण निर्मूलन होऊ शकते, असा प्रश्न आता आदिवासींकडून विचारण्यात येत आहे़ राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या १२ जिल्ह्यांकरिता २००३ पासून ही योजना सुरू केली आहे़ आदिवासींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास आहारात जीवनसत्त्व व इतर आवश्यक पोषकद्रव्ये उपलब्ध करणे, हा तिचा उद्देश आहे़ गेल्या वर्षी कृषी विभागाने या योजनेसाठी आठ लाख रुपये दिले होते़ यंदा त्यात दोन लाखांची कपात करून अवघे सहा लाख रुपयेच कृषी आयुक्तांकडे वर्ग केले आहेत़ यामुळे फळे, भाजीपाला आदिवासींच्या आहारात कसे येणार? कोणत्या प्रकारची फळे, भाजीपाला कुपोषण निर्मूलनास आवश्यक आहेत, हे आदिवासींपर्यंत कसे पोचविणार? लागवडीनंतरही ते खरोखरच त्यांचा उपभोग घेतात की नाही, हे सारे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत़ विशेष म्हणजे हा निधी कृषी विभागाने आदिवासी विकास विभागाशी सल्लामसलत करून वितरीत केला आहे़ या पार्श्वभूमीवर आता सव्वासहा लाखांवर आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी एक हजारापेक्षा कमी निधी देऊन (प्रशासकीय खर्च नाहीच असे गृहीत धरले तर) कृषी विभाग त्यांची परसबागेत कोणती फळे व भाजीपाला पिकविणार अन् आदिवासी विकास विभाग त्यांचा कसा उत्कर्ष साधणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे़राज्यात कुपोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पाहायचे झाल्यास तीन वर्षांपूर्वी सरकारने केलेल्या आरोग्य तपासणीत जानेवारी २०१२ अखेरपर्यंत राज्यात तब्बल १० लाख ६७ हजार ६५९ कुपोषित बालके आढळली होती़नऊ लाख ४३ हजार २१८ मध्यम कुपोषित, तर एक लाख २४ हजार ४४१ तीव्र कुपोषित बालकांचा समावेश होता़ धक्कादायक बाब म्हणजे यापैकी २४ हजार ३६५ बालमृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली होती़ यात आदिवासी भागांतील बालकांची संख्या मोठी होती़ मात्र हे मृत्यू कुपोषणाने झाले नसून कॅल्शिअमची कमतरता, अ‍ॅनिमिया, न्यूमोनिया, श्वसन विकार अन् डायरियामुळे झाल्याचे तेव्हा शासनाने सांगितले होते़