शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा अविश्वास अधिकार शाबूत

By admin | Updated: March 27, 2015 01:22 IST

सरपंच व उपसरपंचांना अविश्वास ठरावाने पदावरून दूर करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिलेले असले तरी त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांचे अविश्वास ठरावाचे अधिकार संपुष्टात आलेले नाहीत.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने २००३ मध्ये विशेष कायदा करून आदिवासी क्षेत्रांतील (शेड्युल्ड एरिया) ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांना अविश्वास ठरावाने पदावरून दूर करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिलेले असले तरी त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांचे अविश्वास ठरावाचे अधिकार संपुष्टात आलेले नाहीत. ग्रामसभेला दिलेले अधिकार हे पर्यायी स्वरूपाचे असून ग्रामसभा व ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी अविश्वासाचे ठराव करून सरपंच व उपसरपंचांना काढून टाकता येते, असा खुलासा उच्च न्यायालयाने केला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पिसेवाडाधा (ता. आरमोरी), जरावंडी (ता. एटापल्ली) आणि कामनचेरू (ता. अहेरी) या ग्रामपंचायतींच्या सरपंच/ उपसरपंचांविरुद्ध गेल्या दोन वर्षांत मंजूर झालेल्या अविश्वास ठरावांच्या संदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर नागपूर खंडपीठाने न्यायाधीश न्या. ए. के. देशपांडे यांनी हा निकाल दिला. त्यामुळे राज्यात आॅगस्ट २००३ पासून लागू झालेल्या या कायद्याचा नेमका अर्थ इतक्या वर्षांनी स्पष्ट झाला आहे.ग्रामपंचायत कायद्याच्या कलम ३५ अन्वये ग्रामपंचात सदस्य सरपंच व उपसरपंचांविरुद्ध साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर करू शकतात. २००३ मध्ये राज्य सरकारने नवा कायदा करून ५४(डी)(३) हे नवे कलम अंतर्भूत केले. त्यानुसार ग्रामसभा गुप्त मतदानाने दोनतृतीयांश बहुमताचा ठराव करून आदिवासी क्षेत्रांतील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांना पदावरून दूर करू शकेल, अशी तरतूद केली गेली.पिसेवाडाधा, जरावंडी आणि कामनचेरू या ग्रामपंचायतींमध्ये अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर सरपंच व उपसरपंचांनी त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिले केली. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी हे अविश्वास ठराव बेकायदा ठरवले. या सर्व ग्रामपंचायती आदिवासी क्षेत्रांतील आहेत. त्यामुळे २००३च्या कायद्यानुसार अविश्वास ठराव ग्रामसभांनी करायला हवे होते, असे कारण त्यांनी दिले. पिसेवाडाधाच्या सरपंच धाया सुधाकर मडवी, जरावंडीचे उपसरपंच देवनाथ रामा सोनुले व अहेरी तालुक्यातील रामपूरचे रमेश लच्छमा पेंडाम यांनी नागपूर खंडपीठात याचिका केल्या. त्यात कायद्याने ग्रामसभेला अविश्वास ठरावाचे अधिकार दिल्यानंतर ग्रामपंचायतींना आधीपासून असलेले हे अधिकार संपुष्टात आले आहेत का, असा मुद्दा निर्णयार्थ होता. न्या. देशपांडे यांनी त्याचे उत्तर नकारार्थी दिले. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल रद्द करून ग्रामपंचायतींमध्ये संमत झालेले अविश्वास ठराव पुनरुज्जीवित केले. परिणामी या तिन्ही ग्रामपंचायतींमधील संबंधित सरपंच/ उपसरपंचांना पदावरून दूर व्हावे लागणार आहे. (विशेष प्रतिनिधी)च्२००३ चा कायदा करताना ग्रामपंचायतींचे अविश्वास ठरावाचे अधिकार काढून घेऊन ते ग्रामसभेला देण्याचा विधिमंडळाचा उद्देश असता तर तसा स्पष्ट उल्लेख व तरतूद केली गेली असती. पण तसे केलेले नाही. च्उलट या कायद्याच्या हेतू आणि उद्दिष्टांची प्रस्तावना वाचली असता आदिवासी भागांमध्ये ग्रामपंचायतींसोबतच ग्रामसभांनाही हा अधिकार देण्यासाठी हा कायदा केला गेल्याचे दिसते. म्हणजेच अविश्वास ठरावाची पद्धत व निकष भिन्न असले तरी हा अधिकार ग्रापंचायत व ग्रामसभा या दोघांनाही असल्याचे स्पष्ट होते.