पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच : अभय पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 15:00 IST2019-07-06T14:28:53+5:302019-07-06T15:00:02+5:30
दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग तालुक्यात आज ही आहे. त्यामुळे अभव पाटील यांना भावनिक फायदा होऊ शकतो.

पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच : अभय पाटील
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदार संघातून विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच आता त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हात ही आता काका- पुतण्याचे राजकीय युद्ध पहायला मिळत आहे.
यावर बोलताना अभय पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मी निवडणूक लढवावी अशी मागणी मतदार संघातील लोकांची आहे. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने जर मला निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यास मी निवडणूक लढवेलच असे अभय पाटील म्हणाले. तसेच पक्षाने थांबण्याचे सांगितले तर पक्षाचा निर्णय मान्य करून माघार घेईल असेही अभय पाटील म्हणाले. तर आमदार भाऊसाहेब पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की आमच्या काका-पुतण्यात यावरून कोणतेही वाद नाहीत.
हेही वाचा काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत
दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग तालुक्यात आज ही आहे. त्यामुळे अभव पाटील यांना भावनिक फायदा होऊ शकतो. तर भाऊसाहेब पाटील यांनी सुद्धा तालुक्यात आपला वचक निर्माण केले आहे. त्यामुळे आता काका- पुतण्याच्या राजकीय शर्यतीत कुणाच्या पदरात आमदारकीची उमेदवारी पडणार हे पाहणे उचित ठरेल.