अब्दुल सत्तारांनी मंदिरात केला प्रवेश, तरुणांनी गोमूत्र शिंपडले; भाजपाकडून टीकास्त्र, उद्धवसेना म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:12 IST2026-02-16T16:11:10+5:302026-02-16T16:12:29+5:30

शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंदिरात प्रवेश केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिराचे शुद्धीकरण केले. 

Abdul Sattar entered the temple, youth sprinkled cow urine; BJP criticized, Uddhav Sena said... | अब्दुल सत्तारांनी मंदिरात केला प्रवेश, तरुणांनी गोमूत्र शिंपडले; भाजपाकडून टीकास्त्र, उद्धवसेना म्हणाली...

अब्दुल सत्तारांनी मंदिरात केला प्रवेश, तरुणांनी गोमूत्र शिंपडले; भाजपाकडून टीकास्त्र, उद्धवसेना म्हणाली...

महाशिवरात्रीनिमित्त शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील एकाच मंदिराला भेट दिली. मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतल्याच्या मुद्द्यावरून आता वाद सुरू झाला आहे. या घटनेचे व्हिडीओही व्हायरल झाले असून, भाजपाने यावरून सत्तारांवर टीका केली आहे. तर उद्धवसेनेने सत्तारांची पाठराखण केली आहे. 

आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिराला भेट दिली. महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सत्तारांनी मंदिरात प्रवेश केल्याने काही तरुण संतापले आणि त्यांनी आक्षेप घेतला. 

अब्दुल सत्ता हे धर्माने मुस्लीम आहेत, ते गोमांस खातात. त्याने मंदिर अपवित्र झाले आहे, असा दावा करत तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडले, असे सिल्लोडचे भाजपाचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी सांगितले. 

भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवे, अशी टीका केली. 

उद्धवसेनेचे अंबादास दानवे यांची टीका

तुषार भोसले यांच्या टीकेवरून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उलट सवाल केला. "मंदिर असो, मशीद असो, हे सर्व सार्वजनिक ठिकाणे आहे. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला आहे का, हराम## तो सांगणारा", असा संताप दानवेंनी व्यक्त केला. 

"एखादा मुस्लीम माणूस मंदिरात जाऊन दर्शन करत असेल, तर त्याचे स्वागत करावे का त्याला विरोध करावा? भाजपा धर्माला संकुचित बनवत आहे. हिंदू धर्म व्यापक आहे", असेही दानवेंनी सुनावले. 

 

Web Title : अब्दुल सत्तार के मंदिर जाने पर विवाद: भाजपा की आलोचना, शिवसेना का बचाव

Web Summary : अब्दुल सत्तार के मंदिर जाने से विवाद हुआ। भाजपा ने अपवित्रता का दावा करते हुए आलोचना की। शिवसेना (यूबीटी) ने समावेशिता पर जोर देते हुए बचाव किया। युवाओं ने अपवित्रता का आरोप लगाते हुए गोमूत्र छिड़का।

Web Title : Abdul Sattar's Temple Visit Sparks Row: BJP Criticizes, Shiv Sena Defends

Web Summary : Abdul Sattar's temple visit ignited controversy. BJP criticized, citing impurity claims. Shiv Sena (UBT) defended, emphasizing inclusivity. Youth sprinkled cow urine, alleging defilement.