वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू

By नितीन पंडित | Updated: June 15, 2025 22:41 IST2025-06-15T22:39:00+5:302025-06-15T22:41:45+5:30

शनिवारी सायंकाळी वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली. ही आग वाढत गेल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी १८ ते २० गोदामे आली.

A worker died in a fire at a chemical warehouse in Val.... | वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू

वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास केमिकल गोदामास लागलेल्या भीषण आगीत मध्यरात्रीच्या सुमारास एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमनाथ भोजने वय ४८ रा.कल्याण असे मयत कामगाराचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली. ही आग वाढत गेल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी १८ ते २० गोदामे आली . केमिकल गोदामातील ड्रमचा स्फोट होऊन ही आग पसरत असताना या आगीच्या झळा मागील व पुढील बाजूकडील गोदामांना सुद्धा लागली. मध्यरात्रीच्या सुमारास मागील बाजूकडील गोदामातील कामगार सोमनाथ भोजने हा गोदामातील काही साहित्य घेण्यासाठी गेला असता, त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा मृतदेह मागील बाजूकडे गोदामा बाहेर आढळून आला.

नारपोली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. भिवंडी सह कल्याण, ठाणे,नवी मुंबई,उल्हासनगर व अंबरनाथ एमआयडीसी यांच्या अग्निशामक दलाने ही आग पहाटे चार वाजता आग आटोक्यात आणली. रविवारी सकाळी घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आग कुलिंगचे काम करीत आहेत. तर, नारपोली पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: A worker died in a fire at a chemical warehouse in Val....