शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मास्टरस्ट्रोक्सची मालिका; राजभवनात पार पडला शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 06:54 IST

सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी दुपारी राजभवनवर गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी शपथ घेणार असल्याचे जाहीर करताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. 

मुंबई : अत्यंत नाट्यमय घटनांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाचे एकमात्र दावेदार मानले जात असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले. अत्यंत अनाकलनीय आणि एकामागोमाग धक्के देणारा घटनाक्रम या निमित्ताने देशाने अनुभवला. 

सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी दुपारी राजभवनवर गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी शपथ घेणार असल्याचे जाहीर करताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. 

 राजभवनवर शिंदे आणि फडणवीस दुपारी तीनच्या सुमारास पोहोचले, त्यांनी राज्यपालांची भेट घेतली, सत्ता स्थापनेचा दावा केला आणि नंतर दोघेही पत्रपरिषदेला सामोरे गेले. फडणवीस यांनी नेहमीच्या शैलीत बोलायला सुरुवात केली आणि  एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री असतील व मी मंत्रिमंडळात असणार नाही, असे त्यांनी सांगताच प्रचंड खळबळ उडाली. 

आपण मंत्रिमंडळात नसू, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर अडीच तासांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, फडणवीस हे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतील, असे जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट केले. 

सरकारचे शनिवारी विश्वासमतविधानसभेचे अधिवेशन २ आणि ३ जुलैरोजी होणार आहे. त्यामध्ये शिंदे सरकार विश्वासमत सिद्ध करेल तसेच विधानसभा अध्यक्षांचीही निवड होईल. 

बाळासाहेब, आनंद दिघेंना स्मरून शपथएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरुन घेतली. शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. शिंदे आणि फडणवीस शपथविधीनंतर मंत्रालयात आले आणि त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. बैठकीत राज्यातील पाऊस, पीकपरिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. 

कर्ते करविते अमित शाह?फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित का राहावे लागले, याची जोरदार चर्चा लगेच सोशल मीडियात सुरू झाली. भाजपच्या श्रेष्ठींनी त्यांचे महत्त्व कमी केले की मुंबईत, महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा शह देण्याची भाजपची ही रणनीती आहे, या चर्चेने जोर धरला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बंडाच्या सुरवातीलाच कबूल करण्यात आले होते पण त्याविषयी गुप्तता बाळगली गेली. हे सर्व ऑपरेशन गृहमंत्री अमित शाह यांनी केले, असेही म्हटले जात आहे.

शिंदे महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य करतील -महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेते असलेले शिंदे महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य करतील. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत, असे पंतप्रधान     नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

...अन् राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे देण्यात आली -राज्याचे ३८-३९ आमदार आसाममध्ये गेले होते. तेव्हा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक असेल असे वाटत नाही. मात्र, भाजपमध्ये दिल्लीचा किंवा नागपूरचा आदेश आला की त्यात तडजोड नसते. हा आदेश आला व त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष     शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो -महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा! असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना