अजित पवारांसोबतच्या ९ मंत्र्यांची यादी आली; शिंदे-फडणवीस राजभवनात पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 14:31 IST2023-07-02T14:31:14+5:302023-07-02T14:31:36+5:30
राजभवनात शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. शिंदे-फडणवीस आमि राज्यपाल स्टेजवर आले आहेत. आता शपथविधीचा कार्यक्रम सुरु होणार आहे.

अजित पवारांसोबतच्या ९ मंत्र्यांची यादी आली; शिंदे-फडणवीस राजभवनात पोहोचले
अजित पवारांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप केला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार त्यांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याची नावे समोर आली आहेत.
राजभवनात शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. शिंदे-फडणवीस आमि राज्यपाल स्टेजवर आले आहेत. आता शपथविधीचा कार्यक्रम सुरु होणार आहे.
नावे खालील प्रमाणे...
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रिफ
धनंजय मुंडे
धर्मरावबाबा आत्राम
आदिती तटकरे
संजय बनसोडे
अनिल पाटील