आमदार अपात्रता सुनावणी  हाेणार एक दिवस आधीच; दिल्लीतील कार्यक्रमामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 07:05 IST2023-10-12T07:02:54+5:302023-10-12T07:05:38+5:30

कार्यक्रमानिमित्त दिल्लीला जावे लागणार असल्याने हा निर्णय घेतल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

A day before MLA disqualification hearing; The decision was taken due to the event in Delhi | आमदार अपात्रता सुनावणी  हाेणार एक दिवस आधीच; दिल्लीतील कार्यक्रमामुळे घेतला निर्णय

आमदार अपात्रता सुनावणी  हाेणार एक दिवस आधीच; दिल्लीतील कार्यक्रमामुळे घेतला निर्णय

मुंबई : आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी वेळापत्रकानुसार शुक्रवारी असताना यात बदल करण्यात आला आहे. ही सुनावणी आता एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारी पार पडणार आहे. कार्यक्रमानिमित्त दिल्लीला जावे लागणार असल्याने हा निर्णय घेतल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

नार्वेकर म्हणाले, मला दिल्लीतील  कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी १३ तारखेची सुनावणी १२ तारखेला घेत आहे. मला यात कोणतीही दिरंगाई करायची नाहीये. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी एक दिवस आधी सुनावणी घेत आहे.
 

Web Title: A day before MLA disqualification hearing; The decision was taken due to the event in Delhi