शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

By यदू जोशी | Updated: December 14, 2020 10:14 IST

कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते.

- यदु जोशीमुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, अनेक विकास कामांना निधी मिळत नसल्याचे चित्र एकीकडे असताना, दुसरीकडे मंत्र्यांची मंत्रालयातील दालने आणि त्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात तब्बल ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गतची रस्त्यांची कामे राज्यात अनेक ठिकाणी निधीअभावी ठप्प आहेत. अनेक कंत्राटदारांची देयके अडली आहेत, पण मंत्र्यांचे बंगले आणि दालनांमध्ये केलेल्या कामाची देयके मात्र कंत्राटदारांना तत्परतेने दिली जात आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांची कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला (३ कोटी २६ लाख), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी -१ कोटी ७८ लाख), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन -२ कोटी २६ लाख),  सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (मेघदूत - १ कोटी ४६ लाख), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (चित्रकूट -३ कोटी ८९ लाख), उद्योगमंत्री सुभाष देसाई (शिवनेरी -१ कोटी ४४ लाख), अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (रामटेक - १ कोटी ६७ लाख),  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (बी ३ - १ कोटी ४० लाख), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (सातपुडा - १ कोटी ३३ लाख), नितीन राऊत (पर्णकुटी - १ कोटी २२ लाख) असे काही बंगल्यांवरील खर्चाचे आकडे आहेत. सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अग्रदूत व नंदनवन असे मलबार हिलवरील आजूबाजूचे दोन बंगले आहेत आणि त्यांच्यावरील खर्चाचा एकूण आकडा २ कोटी ८० लाख रुपये आहे.दुरुस्तीवर महागड्या सामुग्रीचा वापरदुरुस्तीच्या नावाखाली बहुतेक बंगले चकाचक करण्यात आले. आपल्या बंगल्यात महागड्या सामुग्रीचाच (जसे इटालियन मार्बल आदी) वापर करा, असा दबाव मंत्री वा त्यांचे पीए, पीएस आणतात असा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा नित्याचा अनुभव आहे. मंत्र्यांच्या दालनातही महागड्या सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारChhagan Bhujbalछगन भुजबळAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAmit Deshmukhअमित देशमुखAshok Chavanअशोक चव्हाणNitin Rautनितीन राऊतDhananjay Mundeधनंजय मुंडेSubhash Desaiसुभाष देसाई