शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या कृपेने राज्याला ९०० कोटी

By admin | Updated: February 23, 2015 02:33 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कृपेमुळे महाराष्ट्रातील हायवे आणि पूल यांच्या दुरुस्ती व देखभालीकरिता प्रथमच ९०० कोटी रुपये एवढी

मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कृपेमुळे महाराष्ट्रातील हायवे आणि पूल यांच्या दुरुस्ती व देखभालीकरिता प्रथमच ९०० कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मंजूर झाली आहे. आतापर्यंत ‘सेंट्रल रोड फंड’ म्हणून महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी कधी मिळाला नव्हता. ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही घोषणा वास्तवात उतरणे कठीणच असल्याने लोकांच्या रोषाची धार बोथट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.राज्यातील पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर प्रति लीटर एक रुपया असा सेस आकारून केंद्र सरकार ‘सेंट्रल रोड फंड’ उभारते. यातील निम्मी रक्कम ही केंद्र सरकारच्या तर निम्मी रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केली जाते. या रकमेतून राज्यातील हायवे व पूल यांच्या दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात. ज्या राज्यात पेट्रोल, डिझेलचा जेवढा खप त्यानुसार सेंट्रल रोड फंड देण्याचे सूत्र आहे. मात्र भूपृष्ठ वाहतूक हे खाते गडकरी यांच्याकडे असल्याने त्यांनी यंदा ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य महामार्गांची स्थिती व त्यावर आकारला जाणारा टोल यावरून टीका होत असताना आणि टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा प्रत्यक्षात येणे अशक्य असताना अतिरिक्त निधीमुळे मुख्य रस्त्यांची स्थिती सुधारून टोलवरून होणाऱ्या टीकेची तीव्रता कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी)