शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

८४ वर्षापूर्वी भीमरायाच्या स्पर्शाने गावातील ‘त्या’ विहिरीचे पाणी झाले चवदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 5:41 AM

वाघळी येथे उभारणार महामानवाचे स्मारक : ८४ वर्षांपूर्वी मुक्कामी थांबले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जिजाबराव वाघचाळीसगाव(जि. जळगाव) : तारीख होती १७, १८ व १९ जून १९३८. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खान्देश दौऱ्यावर असताना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावी ते मुक्कामी थांबले. या गावातील एका विहिरीचे पाणी ते प्यायले. महामानवाच्या त्या स्मृती जपण्यासाठी चाळीसगाव पंचायत समितीने त्या विहिरीसह  त्यांनी मुक्काम केलेल्या खोलीचे पुनरुज्जीवन करून स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खान्देशवासीयांशी विशेष ऋणानुबंध होते. धुळे न्यायालयात ते कोर्टकज्ज्यांच्या कामासाठी येत. १९३८ मध्ये खान्देशचे पहिले आमदार डी. जी. जाधव यांच्या प्रचारासाठी ते वाघळी येथे आले होते. येथे त्यांनी मुक्कामही केला होता.  खान्देश दौऱ्यावर  ते जाधवांकडे मुक्कामी थांबले.  चौकातील विहिरीचे पाणी ते प्यायले. वाघळी येथील भेटीत त्यांनी गावची चावडी, प्राथमिक शाळा, शिक्षणाचा आढावा घेतला होता. एका खोलीत ते थांबले होते. याच खोलीचे व विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहेे. 

पहिल्या टप्प्यात विहिरीतील गाळ उपसून तिचे बांधकाम केले जाणार आहे. ज्या खोलीत डाॅ. बाबासाहेब मुक्कामी होते, तिचेही बांधकाम करण्यात येणार आहे.

पाच ते सात लाखांचा निधीवित्त आयोगाच्या निधीतून दीड लाखाची तरतूद करण्यात आली आहे. स्मारकासाठी ५ ते ७ लाखांचा निधी लागणार आहे. हा निधी लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. 

बाबासाहेब वाघळी येथे आले होते, त्यावेळी मी आठ वर्षांची होते. बाबासाहेबांना लिंबाच्या झाडाखाली खाट टाकून बसविण्यात आले. रात्री ते मुक्कामी होते. विहिरीचे पाणी प्यायले. - पार्वताबाई जाधव, वाघळी

वाघळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट अविस्मरणीय आहे. या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी स्मारक उभारले जाणार आहे. विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरूही झाले आहे. - नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर