शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

८० % अर्जदार शिक्षकांच्या मातांना कॅन्सर !

By admin | Updated: June 20, 2015 00:20 IST

कौटुंबिक अथवा आजारपणामुळे येणाऱ्या अडचणी समजू शकतात. परंतु, बदलीला स्थगिती देण्यासाठी आलेल्या अर्जांपैकी ८० टक्के शिक्षकांच्या मातांना कॅन्सर आहे.

पुणे : कौटुंबिक अथवा आजारपणामुळे येणाऱ्या अडचणी समजू शकतात. परंतु, बदलीला स्थगिती देण्यासाठी आलेल्या अर्जांपैकी ८० टक्के शिक्षकांच्या मातांना कॅन्सर आहे. तर ९० टक्के शिक्षकांनी वडिलांना अर्धांगवायू झाल्याचे म्हटले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. या सर्व अर्जांची आरोग्य विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये गुरुवारी सायंकाळी तावडे हे पत्रकारांशी बोलत असताना एक शिक्षक बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी अर्ज घेऊन आला. त्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, राज्यातील शिक्षकांच्या पालकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आजार कसे झाले, याबाबत शंका निर्माण होत आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या पालकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय कारणासाठी राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या शिक्षकांच्या बदली करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. याच कारणास्तव संपूर्ण राज्यातून शासनाकडे हजारो शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज आले आहेत. यामध्ये सुमारे ८० ते ९० टक्के शिक्षकांनी अर्जामध्ये आपल्या आईला किंवा वडिलांना कॅन्सर, अर्धांगवायू आणि ह्रदयविकार झाल्याचे कारण दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)