शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची वाट पाहणा-या ८ जणांना कंटेनरने चिरडले

By admin | Updated: November 17, 2014 04:36 IST

सातारा जिल्ह्यातील पारगाव येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर एसटी बसची वाट पाहणाऱ्या ८ प्रवाशांवर रविवारी काळाने अनपेक्षित घाला घातला.

शिरवळ (सातारा) : सातारा जिल्ह्यातील पारगाव येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर एसटी बसची वाट पाहणाऱ्या ८ प्रवाशांवर रविवारी काळाने अनपेक्षित घाला घातला. भरधाव कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली आठ जण चिरडून जागीच ठार झाले. रविवारी दुपारी ही घटना घडली. दुर्घटनेनंतर पळून गेलेला कंटेनरचालक नवनाथ आजिनाथ गीत (रा. खंदा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई) यास पोलिसांनी संध्याकाळी अटक केली.नेहा बापू वाघमारे, प्रमोद बापू वाघमारे (रा. सुखडे), शरिफा ऊर्फ हवाबी फकीर महमंद मांजोरी-कच्छी, शबाना फकीर महमंद मांजोरी-कच्छी (दोन्ही रा.लोणंद, मूळ रा.चिरागनगर,घाटकोपर,मुंबई), सलमा आयुब खान-कच्छी (५२, रा. लोणंद, मूळ रा. भिलाई, मध्य प्रदेश), हलिमा मोहंमद पटेल (४५, रा. कण्हेरी, मूळ रा. घाटकोपर, मुंबई), शकिनाबाई हरुणशेठ कच्छी (७५, रा. लोणंद) हे खंडाळा तालुक्यातील व अविनाश ज्ञानेश्वर गेडाम (२0, रा. रत्नापूर, ता. शिंदेवाडी, जि. चंद्रपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. नेहा व प्रमोद सख्खे भाऊ-बहीण आहेत. परळ आगाराची एसटी बस विट्यावरून परळकडे निघाली होती. ही बस पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव येथे प्रवासी घेण्यास थांबली. त्याच वेळी भरधाव कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटला व तो एसटीच्या डाव्या बाजूला धडकून बसच्या पाठीमागील प्रवाशांवर पडला.दरम्यान, मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली. (प्रतिनिधी)