विजेच्या धक्क्याने ८ मेंढ्या ठार

By Admin | Updated: June 19, 2014 22:30 IST2014-06-19T19:06:54+5:302014-06-19T22:30:25+5:30

विजेची तार अंगावर पडल्याने आठ मेंढ्या ठार

8 sheep killed by electric shocks | विजेच्या धक्क्याने ८ मेंढ्या ठार

विजेच्या धक्क्याने ८ मेंढ्या ठार

खानापूर: वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे तुटलेली विजेची तार अंगावर पडल्याने आठ मेंढ्या ठार झाल्याची घटना पातूर तालुक्यातील आस्टूल येथे १५ जून रोजी घडली.
बुधवार, १५ जून रोजी सायंकाळी आस्टूल येथे वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी प्रशांत करवते यांच्या शेतात खामगाव तालुक्यातील निरोड येथील महादेव रोडूजी मार्कंड यांच्या मालकीच्या मेंढ्या चरण्यासाठी आल्या असता विद्युत खांबावरील विजेची तार तुटली व मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात आठ मेंढ्या जागीच ठार झाल्या. तलाठी पी. एम. धारस्कर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व अहवाल पातूर तहसीलदारांना पाठविला. मार्कंड यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 

Web Title: 8 sheep killed by electric shocks