राज्यात स्वाइन फ्लूचे आणखी ८ बळी !

By Admin | Updated: March 18, 2015 01:28 IST2015-03-18T01:28:55+5:302015-03-18T01:28:55+5:30

राज्याला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट झाला असून, अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३०० वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ८ जणांचा या आजाराने बळी घेतला़

8 more swine flu cases in state | राज्यात स्वाइन फ्लूचे आणखी ८ बळी !

राज्यात स्वाइन फ्लूचे आणखी ८ बळी !

पुणे : राज्याला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट झाला असून, अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३०० वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ८ जणांचा या आजाराने बळी घेतला़ त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३०१ वर पोहोचली. दरम्यान, सोमवारी स्वाइन फ्लूची लागण झालेले आणखी ९६ नवे रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ५७९ वर पोहोचली.
सोमवारी दिवसभरात राज्याच्या विविध भागांमध्ये ११ हजार जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दीड हजार संशयितांना आॅसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले. लागण झालेल्या ३९६ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून,त्यापैकी २६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: 8 more swine flu cases in state