6417 in the state, while in Mumbai 1257 new corona-affected; 137 deaths | मुंबईच्या नावे कोरोना बळींची नकोशी नोंद; बनले देशातील पहिले शहर

मुंबईच्या नावे कोरोना बळींची नकोशी नोंद; बनले देशातील पहिले शहर

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6417 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्य़ात आला असून 1257 नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र, मुंबईत मृत्यूची संख्या मोठी आहे. 


आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली. यामध्ये मुंबईमध्ये आज दिवसभरात 898 रुग्ण बरे झाले आहेत. तर 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2,50,061 एवढा झाला आहे. यामध्ये 2,19152 रुग्ण बरे झाले असून 10,016 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 19,554 रुग्ण उपचार घेच आहेत. 


तर महाराष्ट्रात आज 10,004 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 16,38,961 कोरोनाग्रस्त सापडले असून 14,55,107 रुग्ण बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 43,152 वर गेला आहे. सध्या 1,40,194 रुग्ण उपचार घेत आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 6417 in the state, while in Mumbai 1257 new corona-affected; 137 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.