शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

संपामुळे एसटीचे आतापर्यंत 605 कोटींचे नुकसान - अनिल परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 09:25 IST

Anil Parab :  एसटी संपादरम्यान पाच एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश महामंडळाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात छाननी सुरू आहे. 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाचे ६०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा करून त्यांची वैद्यकीय देयके निकाली काढण्याबाबत तारांकित प्रश्न भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेत शशिकांत शिंदे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर यांनी उपप्रश्न विचारले.

या प्रश्नांवर परब म्हणाले की, संपामुळे महामंडळाचे ६०५ कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय, संपामुळे सामान्य जनता यामुळे वेठीस धरली गेली. कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करूनही अनेक कर्मचारी कामावर परतले नाहीत. निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आश्वासन देऊनही कामावर परतले नव्हते. त्यामुळे  बडतर्फ कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय ताबडतोब मागे घेता येणार नाही.  

या कामगारांना कामावर परतण्यासाठी अनेक संधी दिल्या. त्यामुळे एसटी पूर्णपणे क्षमतेने सुरू झाल्यानंतरच याबाबत विचार करता येईल, असेही ते म्हणाले. एसटी संपादरम्यान पाच एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश महामंडळाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात छाननी सुरू आहे. 

‘कामगारांनी अफवांना बळी पडू नये’कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा कोणताही ठराव झालेला नाही, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली असून, देशातील कोणत्याही राज्यात मिळणाऱ्या पगाराएवढा पगार आता या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. पगार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत नियमित जमा होईल याची हमी सुद्धा राज्य शासनाने घेतली आहे, अशी माहितीही मंत्री परब यांनी दिली.विलिनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा जो काही अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल. तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात राज्य सरकारने भरीव वाढ करूनही एसटी कामगारांचा संप सुरू असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अफवांचे बाजार उठवून हा संप भडकवला जात आहे, कामगारांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही मंत्री परब यांनी यावेळी केले.

टॅग्स :Anil Parabअनिल परबMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा