शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

२०३० पर्यंत ६० टक्केच पाणीसाठा शिल्लक!

By admin | Updated: March 22, 2015 01:28 IST

गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच पातळीवर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, आजघडीला भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होते आहे.

मुंबई : गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच पातळीवर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, आजघडीला भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होते आहे. यावर उपाय म्हणून जर जगभराच्या जल संसाधनाच्या वापराबाबतच्या धोरणांत बदल करण्याची गरज आहे. आणि यासंदर्भातील उपाययोजना आता करण्यात आल्या नाहीत तर मात्र २०३० सालापर्यंत जगाच्या एकूण गरजेच्या केवळ ६० टक्के पाणीसाठा शिल्लक राहील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाने एका पाहणी अहवालाच्या आधारे ही भीती व्यक्त केली आहे. मुळात ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दिवसेंदिवस वाढत असून, भूगर्भातील पाण्याच्या साठ्याचाही उपसा वाढत आहे. परिणामी जागतिक स्तरावरील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट होते आहे. २०५० सालाचा विचार करता जगाची लोकसंख्या ९ अब्ज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ही लोकसंख्या याच वेगाने वाढत राहिली तर व्यक्तिगत वापर आणि शेती व उद्योगांसाठीच्या पाणी वापराचा विचार केला तर अधिकाधिक भूजलाचा वापर होणार आहे. म्हणजेच भूजलाच्या पातळीत घट होत असताना २०५० सालापर्यंत पाण्याची जागतिक स्तरावरील मागणी ५५ टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे जलसंसाधनाच्या धोरणात बदल झाला नाही तर २०३० सालापर्यंत पाण्याच्या गरजेच्या ६० टक्के पाणीच वापरासाठी उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे पाण्याची मागणी आणि पुरवठा यात योग्य समतोल साधण्यात आला नाही तर जगाला पाण्याच्या समस्येचा मोठा सामना करावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. माणसाला दिवसागणिक किती पाणी लागते? याचा विचार केला तरी साधारणपणे पिण्यासाठी ३ लीटर, आंघोळीसाठी १५ ते २० लीटर व इतर कामांसाठी १०० लीटर पाणी लागते. म्हणजेच सरासरी १२५ ते १५० लीटर पाणी ही प्रत्येकाची गरज असते.5 माणसांच्या घरात जवळजवळ ३०० लीटर पिण्याचे पाणी वाया जाते. देशातील ३० ते ४० टक्के जनतेला शुद्ध पाणी अभावानेच मिळते. २० ते ३०% जनतेला त्यासाठी झगडावे लागते.2 हजार मिलीमीटर मुंबईत साधारणपणे म्हणजे २ मीटर पाऊस पडतो; असे गृहीत धरले तर पावसाळ्यात एकूण १ हजार ८०० घनमीटर म्हणजे १८ लाख लीटर पाणी इमारतीच्या गच्चीवरून वाहते.मुंबईतील सरसकट सर्वच झोपड्यांना पाणी देण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही आजही मुंबईमधील २००० सालानंतरच्या झोपड्यांना अधिकृत पाणी नाकारले जात आहे. याविरोधात पाणी हक्क समितीने आवाज उठविला असून, पाणी हा मूलभूत अधिकार असल्याने ते सगळ्यांनाच मिळाले पाहिजे, असे समितीचे म्हणणे आहे.सद्य:स्थितीमध्ये जगात सुमारे ७४.८ कोटी जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही.जगातील उपलब्ध गोड्या पाण्यापैकी सुमारे ७० टक्के पाणी हे अन्न उत्पादनांसाठी खर्च होते.उद्योगधंद्यांना लागणाऱ्या पाण्याची मागणी २०५० पर्यंत सध्यापेक्षा चौपटीने जास्त होणार आहे. परिणामी पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर होणे गरजेचे आहे.