पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 08:00 IST2025-09-29T07:59:30+5:302025-09-29T08:00:10+5:30
एका रात्रीत ३,८०० गावांना दणका; सोलापुरात सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; विदर्भातील तीन जिल्ह्यांत नदी-नाले तुडुंब

पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
मुंबई : पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून, दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे.
रविवारीही मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले. सोलापुरात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिकमध्ये गोदावरीचा पूर कायम आहे.
विशेष अधिवेशन घ्या
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत, यासाठी राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.
महाराष्ट्रात आज कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे
यलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
३० सप्टेंबर : यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड
देवस्थानांकडून मदत
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटीची मदत
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १.११ कोटीची मदत
गुजरातसह पश्चिम भारतात आज जोरधारा
या नकाशावरून दिसते की पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात येथे आज जोरधारा आहेत. काही भागांत ऑरेंज तर काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सीना, गोदा, पूर्णेस पूर
सहा वर्षांत पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर, सोलापुरातील गावे पुन्हा पाण्यात
पावसाचा ट्रेंड बदलला?
भारतात पावसाचा ट्रेंड बदलत चालला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. १९७१ ते २०२० च्या सरासरी पावसाचा ट्रेंड (पहिला नकाशा) पाहिला तर मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग, जळगाव, नंदुरबार या भागात कमी पाऊस होता. यंदा १ जून ते २६ सप्टेंबरपर्यंतचा ट्रेंड (दुसरा नकाशा) पाहिला तर या भागात जास्त पाऊस झाल्याचे दिसते.