शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मिहान इंडियावर ५९.४० कोटी थकीत!

By admin | Updated: January 30, 2015 00:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) ५९.४० कोटी रुपये थकीत असून

कंपनीतर्फे विमानतळाचे परिचालन : थकीत रकमेवर चिंतानागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) ५९.४० कोटी रुपये थकीत असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची अधिकृत माहिती आहे. विमानतळाचे परिचालन सध्या मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही कंपनी करीत आहे. यामध्ये एमएडीसीची (राज्य सरकार) ५१ टक्के तर एएआयची (केंद्र सरकार) ४९ टक्के भागीदारी आहे. आॅगस्ट २००९ मध्ये एमआयएल ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली. करारानुसार १२५ कर्मचारी मिहान इंडियामध्ये कार्यरत आहेत. याच कर्मचाऱ्यांमुळे एमआयएलची कामे सुरू असल्याचा प्राधिकरणाचा दावा आहे. या कर्मचाऱ्यांना मिहान इंडियाने पगार द्यावा, अशी तरतूद असतानाही प्राधिकरणातर्फे पगार देण्यात येतो. तसे पाहता कंपनीला विमानाचे लँडिंग व पार्किंग शुल्क, दुकानांचे भाडे, जाहिराती, बिल्डिंगचे भाडे, प्रति व्यक्ती २२५ रुपये प्रवासी सेवा शुल्क आणि अनेक मार्गाने उत्पन्न मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कंपनीला १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात विमानाच्या लँडिंगद्वारे ९.६५ कोटी प्राप्त झाले. याशिवाय पार्किंगद्वारे ८.६५ लाख, पीएसएफद्वारे १३.५८ कोटी आणि जाहिरातीच्या अधिकाराद्वारे १.०८ कोटी रुपये मिळाले आहेत. चालू आर्थिक वर्षात यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. ही रक्कम एमएडीसीकडे जमा होते. त्यानंतरही मिहान इंडियावर दिवसेंदिवस वाढणारी थकीत रक्कम ही चिंतेची बाब आहे. एएआय ही खासगी कंपनी असती तर ५९.४० कोटींची थकीत रक्कम मिहान इंडिया लिमिटेडकडून वसूल केली असती, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)एअर आशिया नागपुरात हब बनविणारमलेशिया येथील एअर आशिया विमान कंपनी नागपुरात हब बनविण्याच्या तयारीत आहे. कंपनीने राज्य शासनाकडे जागेची मागणी करीत आहे. या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. सध्या कंपनी घरगुती उड्डाणाचे परिचालन चेन्नई येथून करीत आहे. बेंगळुरू-चेन्नई मार्गावर विमानसेवा सुरू आहे. नागपुरात हब झाल्याने हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल.