शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षासहलीसाठी गेलेल्या मुंबईतील ५५ विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

By admin | Updated: June 27, 2017 03:19 IST

माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे.

गिरीश गोरेगावकर । लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. हे विद्यार्थी तेथील देवकुंड भागातील नदीपात्रापलीकडे धबधब्यावर गेले होते. जवळपास दोन तास हे बचावकार्य सुरू होते. मुंबईतील पोदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच. आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थी कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील धबधब्यावर रविवारी दुपारी १२ वाजता पोहोचले. या ठिकाणी देवकुंड व इतर धबधबे एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार झाला असून, येथूनच कुंडलिका नदी उगम पावते. त्या दोन्ही प्रवाहांत सदर ५५ विद्यार्थी सहलीची मौजमजा घेण्यासाठी आले होते. मात्र, दुपारनंतर पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित ठिकाणी येण्यासाठी धावपळ झाली. याच धावपळीत तानेश चेतन बोरकर (१७ रा. मुंबई), हा विद्यार्थी दोन्ही प्रवाहाच्या पलीकडे वाहत गेल्याने जखमी झाला आणि दुसऱ्या बाजूस अडकला होता.इतर विद्यार्थ्यांना नदी ओलांडून येणे शक्य नव्हते व पाण्याचा प्रवाह वाढत होता. त्यामुळे मनजित ठाकूर याने मोबाइलद्वारे रायगड पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून तेथील परिस्थिती कळवली. त्यानंतर माणगाव पोलीस ठाणे अंमलदार म्हात्रे यांनी रावळजे दूरक्षेत्र येथे पेट्रोलिंग करत असलेले माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, कर्मचारी अनिल वडते, रमेश बोडके तसेच टेकाडे यांनी विरेंद्र सावंत यांचे, दैव राफ्टिंगचे पथक घेऊन धबधब्याच्या ठिकाणी धाव घेतली. पोलीस आणि राफ्टिंगच्या पथकाच्या मदतीने दोन ते अडीच तास निकराचे प्रयत करून, सर्व विद्यार्थ्यांची सायंकाळी उशिरापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आली.