शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

By admin | Updated: May 25, 2017 02:27 IST

रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल/भिवंडी : रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले. भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेसाठी बुधवारी झालेली निवडणूक महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा शांततेत पार पडली.पनवेल महापालिकेसाठी ४१८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ५७० मतदान केंद्रांवर ५३ टक्के मतदान झाले. सुट्यांचे दिवस असल्याने अनेक मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदार सकाळपासूनच बाहेर पडल्याचे दिसून आले. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र, खारघरमध्ये अपक्ष उमेदवार किरण नरसिंग मोरे यांना अज्ञात इसमांनी मारहाण करून पळ काढला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत पोहोचले होते, तर अनेकांनी मतदारांना गावावरून आणण्यासाठी गाड्यादेखील पाठविल्या होत्या. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले. मात्र, दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता. उन्हाचा कडाका कमी झाल्याने दुपारी ४नंतर मतदारांचा मतदार केंद्रांबाहेर ओघ पाहावयास मिळाला. ४ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ४५पर्यंत पोहोचला होता.पनवेल महापालिकेच्या या निवडणुकीवर २०१९मधील विधानसभेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चुरस सुरू आहे. अडीच हजार पोलिसांना विविध मतदार केंद्रांबाहेर तैनात करण्यात आले होते. मतदारांना ने-आण करण्यासाठी उमेदवारांनी मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे मतदान केंद्रांबाहेर काही प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती.भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत साधारण ७ ते ८ ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. या निवडणुकीत १५० कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आल्याची माहिती डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. पहिल्या दोन तासांत सरासरी ९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. नंतरच्या दर दोन तासांनी त्यात सरासरी १० टक्क्यांनी वाढ होत होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. त्यानुसार, साधारणत: ५.३० वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

‘‘भयमुक्त परिस्थिती निर्माण करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. तसेच पोलिसांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामुळे निश्चितपणे मागील वर्षीपेक्षा यंदा मतदान जास्त झाले आहे.’’ - डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, भिवंडी- निजामपूर शहर महापालिकाकाँग्रेसकडून एकही तक्रार नाहीमतदानाच्या काळात शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून आयुक्तांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाकडून एकही तक्रार आली नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.