54 constituencies in Maharashtra reserved, see which of your districts? vidhan sabha election | Maharashtra Vidhan Sabha Election: 54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव
Maharashtra Vidhan Sabha Election: 54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. दिवाळीच्या आधीच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यानं दिवाळीआधी विजयाचे फटाके कोण फोडतो आणि कुणाचे फटाके फुसके ठरतात, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. 

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या 54 मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभारतील. त्यामध्ये 29 जागा अनुसूचित जातींसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे 54 मतदारसंघातील उमेदवार हे आरक्षणाचा आधार घेत निवडणूक लढवणार आहेत.   

SC, ST साठी महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ

SC
भुसावळ
मेहकर
मूर्तिजापूर
वाशिम
दर्यापूर
उमरेड
नागपूर उत्तर
भंडारा
अर्जुनी मोरगाव
चंद्रपूर
उमरखेड
देगलूर
बदनापूर
औरंगाबाद पश्चिम
देवळाली
अंबरनाथ
कुर्ला
धारावी
पिंपरी
पुणे कॅन्टोन्मेंट
श्रीरामपूर
केज
उदगीर
उमरगा
मोहोळ
माळशिरस
फलटण
हातकणंगले
मिरज

ST
अक्कलकुवा
शहादा
नंदुरबार
नवापूर
साक्री
शिरपूर
चोपडा
मेळघाट
अमगाव
आरमोरी
गडचिरोली
अहेरी
राळेगाव
अर्णी
बागलाण
कळवण
दिंडोरी
इगतपुरी
डहाणू
विक्रमगड
पालघर
बोईसर
भिवंडी ग्रामीण
शहापूर
अकोले (जि. अहमदनगर)
 

English summary :
Maharashtra Assembly Election 2019 : Reservation has been given to 54 seats (Constituencies) out of the 288 for the 2019 Maharashtra Assembly Elections. Of these, 29 seats are reserved for Scheduled Castes (SC) and 25 seats for Scheduled Tribes (ST). Check Your Constituency.


Web Title: 54 constituencies in Maharashtra reserved, see which of your districts? vidhan sabha election
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.