शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

५० आमदार वेगळी भूमिका घेतात तेव्हा...; एकनाथ शिंदे यांच्याकडून बंडखोरीच्या निर्णयाची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 06:57 IST

राजभवन येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

५० आमदार वेगळी भूमिका घेतात म्हणजे आत्मपरीक्षणाची गरज आहे. आजकाल नगरसेवकही असे पाऊल उचलत नाहीत. तीन-चार वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात यश मिळाले नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपल्या निर्णयाची पाठराखण केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्याचेही शिंदे म्हणाले.

राजभवन येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, स्वत:कडे १२० आमदारांचे संख्याबळ असताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. फडणवीसांसारखी माणसे राजकारणात दुर्मीळ असल्याचे शिंदे म्हणाले.

...अन् फडणवीसांकडून आश्चर्याचा धक्का -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर पर्यायी सरकार देण्याची आवश्यकता आहे. सरकार पडले तर पर्याय देऊ असे सांगितले होते. लोकांच्या डोक्यावर निवडणूक लादणार नाही. 

भाजप आणि शिवसेना विधिमंडळ पक्षासह छोटे पक्ष, अपक्षांच्या पाठिंब्याचे पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही समर्थन दिले आहे. ते मुख्यमंत्री बनतील. साडेसात वाजता एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यानंतर पुढील कार्यवाही करून विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेना आमदार, भाजपचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगत फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. 

नेकं काय म्हणाले शिंदे --  राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.-  महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.-  एकीकडे सत्ता पक्ष, मोठे-मोठे नेते आणि दुसरीकडे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता. अशावेळी या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. याच ताकदीने इतिहास घडविला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. -  पूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.-  भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही आभार. महाविकास आघाडीमुळे अनेक निर्णय घेता येत नव्हते.

नेमकं काय म्हणाले फडणवीस --  हिंदुत्वाचा, सावरकरांचा होणारा अपमान, शिवसेना आमदारांची होणारी कुचंबणा, ज्यांच्याशी मागील निवडणुकीत लढलो आणि पुढेही लढावे लागणार आहे, -  मतदारसंघात ज्यांना पराभूत केले त्यांनाच निधी मिळत असेल तर लढायचे कसे, असा बंडखोर आमदारांचा प्रश्न होता. -  मविआ तोडा, अशी मागणी शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकणे पसंत केले. त्यांची कास धरली. -  भाजप-शिवसेनेला सत्तेचा जनादेश दिला होता. दुर्दैवाने तेंव्हाच्या आमच्या मित्राने वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत सरकार बनविले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा