शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या ६ जिल्ह्यांना पीक विम्यात ५0 % सवलत

By admin | Updated: July 31, 2014 23:39 IST

राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे

राजरत्न सिरसाट, अकोलाराष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार कापसाचा पीक विमा काढताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकूण विमा हप्त्याच्या पंचवीस, तर इतर भूधारक ांना पन्नास टक्केच रक्कम भरावी लागते. देशात केवळ सहा जिल्ह्यांसाठी या विशेष पॅकेजअंतर्गत ही सवलत असल्याने, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची अनुकूलता आता वाढली आहे. नैसर्गिक आपत्ती, कोरडा अथवा ओला दुष्काळ पडल्यास पिकांचे प्रचंड नुकसान होते. त्या नुकसानीची दखल शासनस्तरावर तर घेतलीच जाते; परंतु राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हमखास नुकसानभरपाईही दिली जाते. त्यासाठीच राष्ट्रीय स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली असून, देशभरात या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु विदर्भात ही योजना रुजविण्यासाठी अधिकाऱ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. या योजनेत कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग, तीळ व ज्वारी या खरिपातील आठ पिकांचा समावेश करण्यात आला असून, कापूस पिकासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के, तर इतर भूधारकांना ५० टक्के सवलत अर्थात एकूण विमा हप्त्याच्या अनुक्रमे २५ व ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. विशेष म्हणजे, विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ हे सहा जिल्हे सोडून इतर ठिकाणी विमा हप्त्याची ही सवलत केवळ १० टक्के एवढीच आहे. विशेष पॅकेजअंतर्गत देण्यात येणाऱ्या या योजनेत पिकाचा जोखीम स्तर ६० टक्के आहे. विमा दर १३ टक्के असून, कापूस या पिकाचा सर्वसाधारण विमा हप्ता हेक्टरी २७५६ रुपये आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विम्याची ७५ टक्के रक्कम अर्थात २०६७ रुपये शासनाकडून भरले जात असल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी केवळ ६८९ रुपये एवढा २५ टक्के हप्ता भरावा लागतो. देशात, केवळ विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत विशेष पॅकेजअंतर्गत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उशिरा पाऊस सुरू झाल्याने या योजनेची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे अकोल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगितले. याचा लाभ सर्वच ठिकाणच्या शेतकऱ्यांना होईल.