शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकदारांचे ५० कोटींचे नुकसान

By admin | Updated: October 10, 2016 05:58 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहतुकीबरोबरच एसटीच्या सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला. आंदोलनामुळे मालवाहतुकीचे तब्बल ५0 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली. या घटनेत एसटी बसगाड्यांचीही जाळपोळ व तोडफोड करण्यात आल्याने महामंडळाला ३ कोटींपेक्षा जास्त फटका बसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाशिक आणि परिसरात आंदोलनकर्त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड करतानाच जाळपोळही केली. यात मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. महामार्गाजवळच असणाऱ्या गोंदेगाव, वडवली गाव आणि आणखी एका ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. एक सुमो गाडी तर एक दुचाकी वाहन आंदोलनकर्त्यांकडून जाळून रास्ता रोको करण्यात आला. दुपारी २ ते सायंकाळी ७दरम्यान महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्पच होती. मुंबईहून कसारामार्गे नाशिकला जाणारी वाहतूक पोलिसांकडून पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य आणि माजी अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की,मुंबईच्या विविध भागांतून सुमारे ४५ हजारांहून अधिक माल वाहतुक गाड्या या मार्गाने उत्तर आणि पूर्व भारतात जातात. मुंबई-आग्रा द्रूतगती मार्गावरील घोटीनजीक झालेल्या रास्ता रोकोचा सर्वाधिक फटका बसला. बऱ्याच वाहनांच्या काचा फोडून टायर फाडण्यात आले आहेत. आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रारही वाहन मालकांनी केली असल्याचे सांगितले. तीव्र आंदोलनामुळे माल वाहतुकीचे एका दिवसात सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. शिवाय आणखी १२ ते २४ तास आंदोलनाचा फटका बसल्यास नुकसानाची आकडेवारी वाढेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गाड्यांचे नुकसान मिळून वाहतुकदारांना ५० कोटींहून अधिक भुर्दंड सहन करावा लागल्याचे ते म्हणाले. दरम्यान या आंदोलनात एसटीला मोठा आर्थिक फटका बसला. आंदोलनकर्त्यांनी सात एसटी बस जाळल्या तर नऊ बसची तोडफोड केली. यामुळे महामंडळाला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला. या मार्गावरुन एसटीच्या ५00 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यावर परिणाम झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. जर परिस्थीती अशीच राहिल्यास सोमवारीही मालवाहतुक आणि एसटी सेवांवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)