आकाशातून कोसळला ५ किलोचा ‘बर्फाचा गोळा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:25 IST2026-04-12T06:24:40+5:302026-04-12T06:25:16+5:30
Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजब प्रकार पाहायला मिळाला असून देवली येथील (ता. मालवण) ‘खालची परबवाडी’ परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता आकाशातून सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळला.

आकाशातून कोसळला ५ किलोचा ‘बर्फाचा गोळा’
मालवण - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजब प्रकार पाहायला मिळाला असून देवली येथील (ता. मालवण) ‘खालची परबवाडी’ परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता आकाशातून सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळला.
अर्चना देऊलकर या स्वयंपाक करत असताना अचानक मोठा आवाज झाला. छताची कौले आणि लाकडी भाग तोडून बर्फाचा गोळा थेट स्वयंपाकघरात पडला. विशेष म्हणजे त्यावेळी आकाश निरभ्र होते. भरउन्हात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे.