शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला देणार ४०० कोटींची मोफत वीज

By admin | Updated: October 6, 2014 00:59 IST

सन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली

मोदींचे आश्वासन : गोंदियातील सभेत एकहाती सत्ता देण्याचे आवाहनगजानन चोपडे/मनोज ताजणे - गोंदियासन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली असती तर वर्षाकाठी महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची मोफत वीज मिळाली असती. भाजपाचे शासन केंद्रात येताच या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची वीज दरवर्षी मोफत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित भरगच्च प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यालगतची छत्तीसगड, मध्य प्रदेश ही राज्ये विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मात्र गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आघाडी शासनाने सबंध महाराष्ट्राला पोखरून टाकले आहे. छत्तीसगड राज्यात होत असलेला विकास पूर्ण बहुमत असल्याने शक्य होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत पूर्ण बहुमताचे शासन येणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलणे शक्य होणार नाही. राज्यात वीज, पाणी आणि रोजगार या समस्या आ वासून असताना आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात कोणत्याही समस्येचे निवारण केले नाही. परिणामी क्रमांक एक वर असलेला महाराष्ट्र आज माघारला आहे. महाराष्ट्रात विकासाची दारे पुन्हा उघडायची असेल तर एकहाती सत्ता असणे हाच एकमेव उपाय आहे. दरवर्षी महाराष्ट्रात ३ हजार ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला असताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना पाझर फुटला नाही. ६० वर्षांपासून सत्तासुख भोगणारे काँग्रेसचे नेते मला ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. हा हिशेब आपण जनतेला देणार असून जनताच आपली हायकमांड असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन ‘दल’ असले तरी त्यांचे ‘दिल’ एकच आहे. त्यांच्या सवयी, त्यांचे इरादे सारखेच आहेत. गेल्या ६० वर्षात त्यांनी जेवढे लुटायचे तेवढे लुटले, पण आता तुमच्या भाग्याचा फैसला करण्याची वेळ आली आहे, असे म्हणून भाजपला स्पष्ट बहुमताने निवडून आणा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सायंकाळी ५.१५ वाजता पंतप्रधानांचे वायुसेनेच्या विशेष विमानाने गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आगमन झाले. तेथून थेट ते सभास्थळी पोहोचले. यावेळी संपूर्ण खचाखच भरलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील नागरिकांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी मंचावर मध्य प्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन, गोंदिया-भंडाराचे खासदार नाना पटोले आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार उपस्थित होते. चतुर आहेत शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदराव अत्यंत चतुर राजकारणी आहेत. महाराष्ट्राची जनता आता आपल्याला स्वीकारणार नाही, हे हेरुन स्वत: राज्यसभेत गेले आणि प्रफुल्ल पटेल यांना बळीचा बकरा बनवीत लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविले, अशी फिरकीही मोदी यांनी आपल्या विशेष शैलीतून घेतली. खांद्यावर बंदूक नव्हे, नांगर उचलानक्षलग्रस्त गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी नक्षल चळवळीत दाखल न होता आपल्या देशाच्या विकास कार्यात हातभार लावायला हवा. कुठल्याही देशाचा विकास हिंसेतून होत नाही. त्यामुळे खांद्यावर बंदूकीेऐवजी नांगर उचलण्याचे आवाहन मोदी यांनी युवकांना केले.