शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ४० लाख पंपांची गरज

By admin | Updated: May 14, 2016 02:35 IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल

मुंंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी दिले. गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘एलईडी एक्स्पो २०१६’च्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक नितीन गद्रे आणि बेस्टचे महासंचालक जगदीश पाटील उपस्थित होते.ऊर्जा क्षेत्रात एलईडी तंत्रज्ञानाने आपले महत्त्व विशद केल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे या वेळी म्हणाले की, देशासह विदेशात वाणिज्यिक, उद्योग, घरगुती इत्यादी क्षेत्रात एलईडीचा वापर ऊर्जाबचतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एलईडी तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावत आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची ऊर्जेची गरज लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार एलईडी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे. भविष्यात एलईडी तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेले सर्व दिवे/ ट्युबलाईट / पथदिवे हे एलईडीमध्ये बदलण्याबाबतचे आदेश दिले आहेत. शिवाय १०० शहरांतील रस्त्यांवरील पथदिवे बदलून एलईडी पथदिवे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रदर्शानात चीन, हाँगकाँग, कोरिया, तैवान आणि अमेरिका येथील १५०हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून, हे प्रदर्शन १४ मेपर्यंत खुले आहे. (प्रतिनिधी)