शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

३७ हजारांपैकी बियाण्यांचे ४ हजार ८४७ नमुने ‘नापास’

By admin | Updated: July 31, 2014 01:00 IST

पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेची टक्केवारी जाणून घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत सुमारे ३७ हजार ८९२ बियाण्यांची तपासणी

बियाण्यांची तपासणी : राज्यात पुणे, परभणी व नागपूर येथे प्रयोगशाळाप्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेची टक्केवारी जाणून घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत सुमारे ३७ हजार ८९२ बियाण्यांची तपासणी करून घेतली़ पैकी ४ हजार ८४७ बियाण्यांचे नमुने ‘नापास’ झाले आहेत़ नापास बियाण्यांची टक्केवारी १२.८४ टक्के आहे.शेतकऱ्यांकडील बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत संशय असल्यास तपासणी करून घेता येते़ यातून संभाव्य धोका टाळता येऊ शकतो़ बियाण्यांची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाने पुणे, परभणी व नागपूर येथे स्वतंत्र बियाणे तपासणी प्रयोगशाळा उभारली आहे. दरवर्षी सुमारे ४८ हजार नमूने तपासले जातील, एवढी प्रयोगशाळांची क्षमता आहे. या ठिकाणी शेतकरी तसेच विविध बियाणे कंपन्या, कृषी संस्था खरीप, रबी व उन्हाळी हंगामात विविध वाणांच्या बियाण्यांची तपासणी करून घेतात़ यात प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा, गहू, बाजरी, ज्वारी, भूईमुग, तूर, उडीद, कापूस, भात तसेच इतर भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची तपासणी करून घेतली जाते़ यामुळे बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत चिंता राहत नाही़ पेरणीनंतर बियाणे उगविले नाही तर काय, ही भिती दूर होऊन संभाव्य धोका टाळता येतो.शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील बियाण्यांची योग्यवेळी चाचणी करून घेतली तर उगवण क्षमतेबाबत साशंकता राहत नाही. यामुळे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरता येतात. जे बियाणे चाचणीअंती नापास झाले, तेच बियाणे चाचणी न करता लावले गेले तर उगवण क्षमतेवर परिणाम होऊन आर्थिक फटका बसतो. प्रयोगशाळेत बियाण्यांच्या उगवण क्षमतेची खात्री झाल्यावर भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करता येते़ शेतकऱ्यांनी प्रयोगशाळेचा आधार घेऊन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी करून घेणे निश्चितच फायद्याचे आहे.