शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
5
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
6
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
7
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
8
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
9
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
10
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
11
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
12
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
13
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
14
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
15
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
16
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
17
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
18
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
19
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
20
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

Coronavirus: महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 16:36 IST

राज्यात कोरोनाचे ३८ रुग्ण सापडले असून सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड, पुण्यात

ठळक मुद्देपिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्णपिंपरी चिंचवड, पुण्यात कोरोनाचे १६ रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री

मुंबई: जगभरात शेकडो लोकांच्या मूत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशातही वाढताना दिसतेय. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आलीय. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी राज्यातल्या सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या कोरोनाचे ३८ रुग्ण असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे भागात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून पुण्यातल्या ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. राजधानी मुंबईत ६, तर उपराजधानी नागपुरात ४ रुग्ण आढळून आलेत. याशिवाय यवतमाळ, कल्याणमध्ये कोरोनाचे प्रत्येकी ३, नवी मुंबईत २, तर  रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेशकोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. परिस्थिती आटोक्यात असली तरी गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजाअर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथीचे रोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष, संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, अशा सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस