शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढ सरासरी ३५ टक्के!

By admin | Updated: February 23, 2015 03:04 IST

महावितरण वीज कंपनीने महसुली तूट भरून काढण्यासाठी ४ हजार ७१७ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.

मुंबई : महावितरण वीज कंपनीने महसुली तूट भरून काढण्यासाठी ४ हजार ७१७ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तथापि, प्रत्यक्षात हा प्रस्ताव १० हजार ६२५ कोटींचा आहे, असा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. त्यामुळे ही वीजग्राहकांची फसवणूक असून, नोव्हेंबर २०१४मधील दरांच्या तुलनेत वीजग्राहकांवर आता ३५ टक्के इतका दरवाढीचा बोजा लादला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. औद्योगिक विजेचे दर कमी करणार आणि दाभोळची वीज नाकारणार, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी केले त्याच दिवशी हा वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल झाल्याचे होगाडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, नोव्हेंबर २०१४ च्या तुलनेत विचार करता ३०० युनिटच्या आतील सर्वसामान्य घरगुती ग्राहकांवरील दरवाढ स्लॅबनिहाय १७ ते ७१ टक्के आहे. लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि यंत्रमागधारकांवरील वाढ १६ ते २४ टक्के आहे. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांवरील वाढ १६ ते २९ टक्के आहे. शेतकरी ग्राहकांवरील वाढ ११ ते २३ टक्के आहे आणि स्थिर आकारातील वाढीची मागणी सरसकट १५ ते २५ टक्के आहे. दोन्ही दरवाढींचा विचार करता घरगुती ग्राहकांची वीजबिले नोव्हेंबर २०१४च्या तुलनेने दीडपट तर औद्योगिक ग्राहकांची बिले किमान सव्वापट होतील. तर उर्वरित राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर दीडपट अथवा दुप्पटच राहणार असून, अवाढव्य प्रशासकीय खर्च, वीजचोरी, अतिरिक्त वीज वितरण गळती यांची किंमत ग्राहकांना मोजावी लागत असल्याचे होगाडे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)