शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

CoronaVirus: पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:20 AM

विमानसेवा रद्द झाल्याने उद्भवली समस्या

- अनिकेत घमंडीडोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे पर्यटनासाठी गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. त्यामध्ये नाहुर येथील दिनेश पानसरे, किशोरी कडवे  हे दाम्पत्य अडकले आहे. १३ ते २० मार्च या कालावधीत त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ते सगळे पर्यटक सुखरुप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परत कसे जायचे या चिंतेत ते आहेत. नाहुर येथील रहिवासी दिनेश पानसरे यांनी ‘लोकमत’ ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्वतंत्रपणे ते पर्यटनासाठी गेले होते. कोणत्याही सहलींचे आयोजन करणा-या व्यावसायिकांमार्फत ते तेथे गेलेले नाहीत. मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे,  दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत. पण आता त्यांच्याजवळील राखीव ठेवलेला पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी किती दिवस तेथे रहायचे ही चिंता त्या सगळयांसमोर असून ते तणावाखाली आहेत. पानसरे म्हणाले की, त्यांनी मलेशियन एअरलाईन्सचे तिकिट काढले होते. नियोजनानूसार १३ मार्च रोजी ते तेथे विमानाने गेले, परत येण्यासाठी २० मार्च चे तिकिट होते, परंतू ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे पेच वाढला. तरीही त्यांनी सतर्कता दाखवत लगेच सुमारे ६५ हजार रुपये खर्च करुन एअर इंडियाचे २२ मार्च रोजीची दोन तिकिट काढली, मात्र तेदेखील रद्द झाले. आधीच भारतात परत कसे जायचे आणि विमान तिकिटांसाठी खर्च झालेले पैसे परत मिळतील की नाही? याचीही शाश्वती कोणालाही नाही, त्यामुळे ते अडकल्याच्या भावनेने महिला पर्यटकांना रडू कोसळले. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे आणखी किती दिवस बालीतच रहायचे? असा सवाल पर्यटकांनी केला. तसेच परत जाण्यासाठी पैसेदेखील नसल्याने आता विमानाच्या तिकिटसाठी लागणारी रक्कम कोण देणार ? तो कसा उभारणार ? असे प्रश्न त्यांना पडले असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली. पानसरे यांचे सासरे भाऊसाहेब कडवे हे देखिल नाहुर येथे राहतात. त्यांनी पानसरेंना गुरुवारी ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवल्याचे सांगण्यात आले. अडकेल्या सर्व पर्यटकांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालावे अशी मागणी कडवे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndonesiaइंडोनेशिया