Kunbi Certificates: मराठवाड्यात ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्र, कोणत्या जिल्ह्यात किती दाखले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:06 IST2026-02-13T09:02:08+5:302026-02-13T09:06:26+5:30

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती आली आहे. हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींच्या आधारे मराठवाड्यात आतापर्यंत ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

310 Kunbi Certificates Issued in Marathwada Based on Hyderabad Gazetteer; Parbhani Leads with 160 | Kunbi Certificates: मराठवाड्यात ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्र, कोणत्या जिल्ह्यात किती दाखले?

Kunbi Certificates: मराठवाड्यात ३१० जणांना कुणबी प्रमाणपत्र, कोणत्या जिल्ह्यात किती दाखले?

राज्य सरकारने काढलेल्या नवीन शासन निर्णयाची अंमलबजावणी मराठवाड्यात वेगाने सुरू झाली. हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींच्या आधारे आतापर्यंत मराठवाड्यातील ३१० जणांना कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात करण्यात आली आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी शोधण्याची आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून युद्धपातळीवर राबवली जात आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत मराठवाड्यातून एकूण ७१० जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. या अर्जांची सखोल छाननी केल्यानंतर त्यातील ३१० अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. मात्र, आवश्यक कागदपत्रे किंवा पुराव्यांच्या अभावामुळे २४ अर्ज फेटाळण्यात आले असून उर्वरित अर्जांची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

मराठवाडा पूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग असल्याने, अनेक जुन्या नोंदी या हैदराबाद गॅझेटिअरमध्ये उपलब्ध आहेत. सरकारने या गॅझेटिअरमधील नोंदींना वैध पुरावा मानण्याचे आदेश दिल्याने ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. विशेषतः परभणी आणि बीड जिल्ह्यात जुन्या नोंदी मोठ्या प्रमाणात आढळल्याने तेथे प्रमाणपत्र वाटपाचा आकडा मोठा आहे.

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत मिळालेल्या प्रमाणपत्रांची आकडेवारी-

परभणी: १६०
बीड: ९१
जालना: ३५
लातूर:
नांदेड:
धाराशिव:
हिंगोली:

प्रशासनाचे आवाहन

ज्या नागरिकांकडे निजामकालीन महसुली पुरावे, शैक्षणिक उतारे किंवा वंशावळीचे पुरावे उपलब्ध आहेत, त्यांनी आपल्या तालुक्यातील सेतू केंद्रात अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. फेटाळण्यात आलेल्या अर्जांबाबत संबंधित नागरिकांना त्रुटींची पूर्तता करण्याची संधी दिली जाणार आहे.

Web Title: 310 Kunbi Certificates Issued in Marathwada Based on Hyderabad Gazetteer; Parbhani Leads with 160