शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार कोटींचे प्रकल्प थंडबस्त्यात!

By admin | Updated: December 19, 2014 04:02 IST

राज्यात सिंचनाचे ३०,२४०.७१ कोटी रुपये खर्चाचे १४५ प्रकल्प सरकारच्या नव्या भूमिकेमुळे थंड्या बस्त्यात जाणार आहेत. त्याचवेळी ज्या प्रकल्पांवर ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे

अतुल कुलकर्णी, नागपूर -राज्यात सिंचनाचे ३०,२४०.७१ कोटी रुपये खर्चाचे १४५ प्रकल्प सरकारच्या नव्या भूमिकेमुळे थंड्या बस्त्यात जाणार आहेत. त्याचवेळी ज्या प्रकल्पांवर ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे असे प्रकल्प आधी पूर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जाहीर केल्यामुळे राज्यातल्या ९३ प्रकल्पांना वर्षभरात संपूर्ण निधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.आता युती सरकारने ७५ टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना आधी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातल्या जसा ९३ प्रकल्पांना होणार आहे तसाच त्याचा फटका ३५९ लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांना बसणार आहे. अशा प्रकल्पांना २०१५-१६ या आर्थिक वर्षात एक रुपया देखील मिळू शकणार नाही. प्रत्येकाला आपल्या भागातील प्रकल्पासाठी निधी हवा आहे. त्यासाठी सतत राजकीय दबाव टाकण्यात आल्यामुळे ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने आघाडी सरकारने सगळ्यांना निधी वाटप केला. परिणामी राज्यात एकही प्रकल्प पुर्णत्वास गेला नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज होती ती देखील आघाडी सरकारला दाखवता आली नव्हती. मात्र युती सरकारने आजतरी ती भूमिका जाहीरपणे घेतली आहे. सगळे प्रकल्प पूर्ण होतील मात्र प्राधान्यक्रम ठरवूनच ते पूर्ण होतील असे जलसंपदा मंत्री महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.असे असतानाही मागील सरकारने नवीन कामे घेण्याचा सपाटा लावला तेव्हा राज्यपालांनी हस्तक्षेप केला. कोणतीही नवीन कामे घेऊ नका, ६०० हेक्टर सिंचन होणारे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी त्यांना पैसे कोठून आणणार हे स्पष्ट करा, आणि आहे त्याच प्रकल्पांसाठी प्रचंड पैसे लागणार आहेत त्यामुळे प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा असे स्पष्ट आदेशही राज्यपालांनी दिले होते. तरीही त्यावर अंमलबजावणी झाली नाही. युती सरकारने सत्तेवर येताच मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यामुळे निधी न मिळणारे प्रकल्प ज्या भागात आहेत त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हा निर्णय कशा पध्दतीने स्वीकारतील हा महत्वाचा भाग आहे.